जयंत पाटलांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘….म्हणून राज्यात अधिवेशन घेत नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहून केंद्रात अधिवेशन(Convention) रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन(Convention) का घेत नाही, याचे कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात. पण केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Lockdown in Maharashtra : राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस लॉकडाऊन वाढणार?, राजेश टोपेंचे संकेत

पुण्यात साखर कारखान्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री जयंत पाटील विविध विषयांवर बोलत होते. लॉकडाऊन वाढवण्याबाबत 2 दिवस परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री निर्णय घेतील असे पाटील म्हणाले. राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही खाली गेले आहेत. पण हा रेट पूर्णपणे कमी होत नाही. तोपर्यंत संकट अजून टळले असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही. तर काही ठिकाणी मृत्यदरातही घट होत नाही. त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्याची रणनीती ही वेगळीच असणार आहे. कोरोना संदर्भात ऑक्सिजन, औषधे, बेड आदी गोष्टीचा विचार करावा लागेल. त्यांची कमतरता भासणार नाही याकडे सरकार अधिक लक्ष देणार आहे. या सर्व गोष्टी पाहून लॉकडाऊनचा विचार केला जाईल, अशी भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

Pune : मद्यपान करून सतत भांडण करणर्‍या दोघांना 5 जणांकडून मारहाण, घरावर दगडफेक केल्याची वानवडीत घटना

रोगप्रतिकारशक्ती, ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, जाणून घ्या

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

‘या’ 6 संकेताद्वारे ओळखा तुमच्या लिव्हरला आहे मदतीची गरज, लिव्हर फ्रेंडली 6 फुड कोणते, जाणून घ्या

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ पद्धतीने करा मुगडाळीचे सेवन, जाणून घ्या