खुशखबर ! मोदी सरकार आता थेट बँक खात्यात जमा करणार ‘ही’ सबसिडी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेत आता ७०,००० करोड रुपयांपेक्षा अधिक खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याला घेऊन मोठे पाऊल टाकले आहे. सरकारने यासाठी ३ नव्या तंत्रज्ञानांवर काम सुरु केले आहे. नव्या तंत्रज्ञानाने राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर खत पुरवठा, उपलब्धता आणि आवश्यकता यांचा सर्व तपशील एकाच डॅशबोर्डवर मिळेल. याची माहिती देताना सचिव छबीलेंद्र राउल म्हणाले की, “सरकारने पीओएस सॉफ्टवेअर एडिशन 3.0 विकसित केलं आहे. यात रजिस्ट्रेशन आणि लॉग इन दरम्यान आधार व्हर्चुअल ओळखीचा ऑप्शन तसेच वेगवेगळ्या भाषांचा पर्यायही असेल.

त्यांनी सांगितले की, यात मृदा आरोग्य कार्ड शिफारशीची तरतूदही असेल. तसेच शेतकऱ्यांसाठी विकल्या गेलेल्या खतांची आकडेवारीही उपलब्ध असणार आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर –

सरकारच्या या निर्णयाने आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) नुसार, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता खत अनुदान टान्सफर होणार आहे. खत डीबीटीचं पहिलं चरण ऑक्टोबर 2017 मध्ये सुरु होणार आहे. यानुसार, पीओएस मशीनींकडून मिळालेल्या किरकोळ विक्रीच्या आकड्यांची तपासणी केल्यानंतर अनुदान थेट कंपनीला दिलं जातं.


कंपीन्यांनाही दिलासा

डीबीटी 2.0 सुरु करण्याबाबत केमिकल अँड फर्टिलायजर मंत्री सदानंद गौडा म्हणाले की, “या नव्या निर्णयाने निश्चित रुपात शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्यास मदत मिळेल. आमचा जो प्रयत्न आहे त्यातही मदत मिळेल. यामुळे खतसंबंधित क्षेत्रात पारदर्शकता येईल.”

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

 

Loading...
You might also like