निवडणुकीत धर्माचा वापर, खा. इम्तिायाज जलील यांच्या निवडीला ‘आव्हान’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही याचिका दाखल केली. जलील यांनी धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आक्षेप नदीम यांनी नोंदविला आहे.

एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधु अकबरोद्दीन ओवेसी यांनी हिंदु आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे केली असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. त्याबरोबर त्यांच्या भाषणाची यु ट्युट वरील व्हिडिओ क्लीप ही जोडण्यात आली आहे.

शेख नदीम यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस ठोंबरे यांच्यामार्फत निवडणुक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक लढविलेल्या सर्व उमेदवारांना प्रतिवादी केले आहे.
याचिकेत म्हटल्यानुसार निवडणुक प्रचारादरम्यान मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांसह काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष झांबड यांचे छायाचित्र असलेल्या हस्तप्रत्रिका वाटण्यात आल्या.

खासदार जलील हे मुस्लिम असल्याने त्यांना मतदान करण्याचे आवाहन व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर मुस्लिम समाजाला करण्यात आले होते. जलील यांच्या सहकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील मशिदींमध्ये बैठका घेऊन जलील यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. याबाबत याचिकाकर्त्याने १२ जून आणि २७ जून रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पत्रकार असलेले इम्तिायाज जलील यांनी ५ वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. २०१४ मध्ये औरंगाबाद मधून ते प्रथम एमआयएमकडून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आता २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करुन खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यावेळी याचिका करणारे बहुजन महापार्टीचे उमेदवार नदीम शेख यांना केवळ १२१० मते पडली आहेत.

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय