Chanakya Niti : वाईट आणि कठीण काळात साथ देतात ‘या’ 5 गोष्टी, येऊ शकतात तुमच्या उपयोगी

पोलीसनामा ऑनलाइन – कुशल अर्थतज्ज्ञ आणि निती शास्त्रातील महाविद्वान आचार्य चाणक्य यांनी म्हंटल्यानुसार, मानवी जीवनात एक अशी वेळ जरूरी येते, जेव्हा व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो. या पृथ्वीवर ज्यांनी जन्म घेतला आहे, त्याचे सुख – दुखाशी थेट नाते आहे. वाईट काळ मनुष्याची परीक्षा घेण्यासाठी येतो. जो या परीक्षेच्या वेळी धैर्य आणि धाडस सोडत नाही तो यशस्वीपणे आपले लक्ष्य प्राप्त करतो.

1 विद्या आणि ज्ञान
चाणक्य यांच्यानुसार विद्या एक असे गुप्तधन आहे जे प्राप्त करून वाईट काळ सरळपणे घालवता येऊ शकतो. यामुळे मान-सन्मान प्राप्त होतो. लोक मदतीसाठी हात पुढे करतात.

2 धैर्य आणि संयम राखणे
चाणक्य यांच्यानुसार जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येईल तेव्हा धैर्य आणि संयमाने घेतले पाहिजे. मनुष्याला प्रत्येक अवघड काळात नेहमी तयार राहिले पाहिजे. संकटाच्या काळात घाबरण्यापेक्षा धैर्य राखण्याची गरज असते. वाईट काळात धैर्याने काम करणे सर्वात उत्तम मानले जाते. यामुळे यश मिळते.

3 धनसंच आणि दान
चाणक्य नितीनुसार धनसंचय करणे खुप जरूरी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या वाईट काळासाठी पैसा वाचवून ठेवला पाहिजे. श्रीमंत व्यक्ती पैशाच्या बळावर अनेक संकटांना तोंड देण्यास सक्षम असतात. गरजूंना मदत करणे आणि धन दान सुद्धा महत्वाचे आहे हे गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. निस्वार्थ भावनेने आणि हृदयापासून केलेल्या दानाचे फळ प्राप्त होते.

4 निर्णय घेण्याची क्षमता
चाणक्य नितीनुसार व्यक्तीने आवेशात येऊन कोणतेही काम करू नये. तसेच कोणताही निर्णय घेऊ नये. कारण चुका होऊ शकतात. यशस्वी होण्यासाठी विचारपूर्वक निर्झ घेण्याचा क्षमता असावी.

5 आत्मविश्वासाची भावना
चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. कुणाच्या बोलण्याने विश्वास डगमगू देऊ नका.