Chandan Nagar Kharadi Pune Crime | चंदननगर: खालसा जीमच्या जलतरण तलावात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, सुरक्षा रक्षक व व्यवस्थापकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandan Nagar Kharadi Pune Crime | चंदननगर परिसरातील एका खासगी जलतरण तलावात बुडून 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.16) घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या परिसरात जीवरक्षक नसल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. अतिक नदीम तांबोळी (वय-14 रा. वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अतिक तांबोळी हा इयत्ता आठवी मध्ये शिकत होता. (Chandan Nagar Kharadi Pune Crime)

याप्रकरणी नदिम इस्माईल तांबोळी (वय-40 रा. गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन खालसा जिम (Khalsa Gym) मधील सुरक्षा रक्षक व व्यवस्थापक यांच्यावर आयपीस 304(अ), 336, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान, संघर्ष चौकातील (Sangharsh Chowk Chandan Nagar) खालसा जिम येथील जलतरण तलावात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील संघर्ष चौकात खालसा जिम आहे. खालसा जिमच्या आवारात जलतरण तलाव आहे. मगळवारी दुपारी अतिक आणि त्याचे मित्र जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी दमछाक झाल्याने अतिक जलतरण तलावात बुडाला. अतिक तलावात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. व्यायामशाळेतील तरुणांनी पाण्यात बुडालेल्या अतिकला बाहेर काढले. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की, अतिक नुकतेच पोहायला शिकला होता.
तो त्याच्या मित्रांसोबत दुपारी पोहण्यासाठी खालसा जलतरण तलावात गेला होता.
पोहायला गेल्यानंतर बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे कोणीही जीव रक्षक उपस्थित नव्हते.
तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहेत.

तांबोळी कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब असून मागील बारा वर्षापासून वडगाव शेरी येथे वास्तव्यास आहे.
अतिकचे वडील चालक म्हणून काम करतात. अतिकला दोन लहान भावंडे आहेत. गरीब घरातील हाताशी आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव शेरीत (Vadgaon Sheri) शोककळा पसरली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज