केवळ १० हजार रूपयात व्हा १ एकर जमिनीचे ‘मालक’

चंदीगढ : वृत्तसंस्था- स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर पंजाब सरकारने राज्याची सहा हजार जमीन त्या जमिनीचा वर्षानुवर्षे वापर करणाऱ्यांच्या नावावर करायचा निर्णय घेतला आहे. ही जमीन विविध जातींच्या लोकांजवळ होती, हे लोक अनेक वर्षे या जमिनीवर शेती करत आहेत, परंतु या जमिनीवर त्यांचा मालकी हक्क नव्हता. ही जमीन खरेदी करण्याची त्यांच्याकडे आर्थिक क्षमता देखील नाही.

सर्व जातीतील लोक १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानहून भारतात आलेल्या आहेत. त्यांनी या जमिनीवर ताबा मिळवून शेती करण्यास सुरवात केली. पंजाब सरकार ‘द पंजाब भोंडेदार, बूटेमार, दोहलीदार, इंसार मियादी, मुकारीदार, मंधीमार, पुनाहीकदमी, सौंझीदार बिल २०१९’ हा कायदा करणार आहे. सरकार या जमिनी दहा हजार प्रति एकर या भावाने विकणार आहे तसेच या जमिनी कायमस्वरूपी त्या लोकांच्या नावावर करण्यात येणार आहे.

महसूल मंत्री सुखबिंदर सिंह यांनी सांगितले की पंजाबमध्ये अशी ६००० एकर जमीन आहे. या जमिनीवर ७००० लोक सामील आहेत. यांच्याजवळ जमिनीच्या मालकीचे हक्क नसल्यामुळे कर्ज घेण्यास तसेच इतर आर्थिक व्यवहार करताना अडचणी येतात. राज्य सरकारने आता या लोकांना जमिनीचे मालकी हक्क दिले आहेत.

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 

अल्पसंख्याकावर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला – हाफिज अ.गफार