JJP आमदाराने व्यक्त केल्या भावना, म्हंटले – ‘आम्ही जेव्हा गावात जातो, तेव्हा आम्हाला रोखले जाते’

चंदीगड : वृत्तसंस्था – टोहाना येथील जननायक जनता पक्षाचे आमदार देवेंद्र बबली यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले. सभागृहात शेतकरी आंदोलनाच्या बाजूने निवेदन देताना बबली म्हणाले की, शेतकर्‍यांची परिस्थिती चिंताजनक असून ही चळवळ राज्याच्या हितााची नाही. शेतकरी, वृद्ध महिला आणि मुले राज्याच्या सीमेवर बसले आहेत. हे चिंताजनक आणि अत्यंत वेदनादायक आहे. जेव्हा आम्ही गावात जातो तेव्हा आम्हाला सांगितले जाते की आपण गावात येेेऊ नये. आम्हाला खेड्यातल्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यक्रमांना येण्यापासून रोखलं जात आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळातून अशी मागणी करतो की, या शेतकरी चळवळीवर तोडगा काढला पाहिजे.

सरकारला प्रश्न विचारत ते म्हणाले की, हरियाणा सरकार मला सावत्र वागणूक देत आहे. सरकारमध्ये भागीदार असूनही माझ्या दृष्टीने विकासकामे केली जात नाहीत. त्यांनी सरकारला विचारले, टोहाना विधानसभा मतदार संघातील लोकांनी मला एक लाखाहून अधिक मतांनी जिंकून चूक केली का ? मी इतक्या मोठ्या मताने विजयी झालो आहे, त्यामुळे माझ्या भागाचा विकास होत नाही का?

ते म्हणाले की, जर हेच कारण असेल तर मी माझ्या भागाच्या विकासासाठी माझे सदस्यत्व सोडण्यास तयार आहे. मी जागा सोडतो पण माझ्या मतदारसंघाची विकासकामे थांबवू नका. दरम्यान, देवेंद्र बबली यांनी मागील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.

जेजेपीचे आमदार देवेंद्र बबली की, मी डोक्याने नाही तर मनाने बोलतो. माझ्या मनात जे काही आहे ते मी बोलतो. निश्चितच शेतकरी आंदोलन राज्याच्या हिताचे नाही. शेतकरी चळवळीमुळे राज्यात औद्योगिक विकास होत नाही, सरकारने लवकरच तो प्रश्न सोडवला पाहिजे. देवेंद्र बबली म्हणाले की, कॉंग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला तरी सरकार सुरक्षित आहे, सरकारला कोणताही धोका नाही. माझे मत सरकारला जाईल, पण जी वास्तविकता आहे, ती मी व्यक्त केली.