Chandra Grahan 2021 : 26 मे रोजी वर्षातील पहिले चंद्र ग्रहण, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – वर्षातील पहिले चंद्र ग्रहण 26 मे 2021 ला होणार आहे. यावेळी चंद्र ग्रहण उपछाया चंद्र ग्रहण आहे जे भारतात दिसणार नाही. या दिवशी वैशाख पौर्णिमा असल्याने हे ग्रहण खास आहे. उपछाया चंद्र ग्रहण असल्याने यात सूतक मान्य नाही. चंद्र ग्रहण दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी सुरू होऊन सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी संपेल. ज्योतिषनुसार, या ग्रहणाचा राशींवर परिणाम होतो. यावेळी विविध राशींवर कोणता परिणाम होणार ते जाणून घेवूयात…

मेष- प्रवास करताना सतर्क रहा. अचानक धनलाभाचे योग आहेत. मानसिक तणाव राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. रखडलेला प्रोजेक्ट पूर्ण होईल.

वृष- वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. आर्थिक लाभ होईल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

मिथुन- ग्रहण लाभदायक आहे. मात्र तर्क-वितर्क करणे टाळा. मेडिटेशन करा. काही अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागू शकतो.

कर्क- मानसिक तणाव किंवा पोटाची समस्या होऊ शकते. दुसर्‍यांचे ऐकणे टाळा, मनाचे ऐका. व्यापारात चांगले परिणाम मिळतील. अपघाताची शक्यता, सावधगिरी बाळगा.

सिंह- संमिश्र परिणाम दिसू येईल. मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले ठरेल. नात्यांसाठी चांगली वेळ. व्यापारात यश मिळेल. काही आर्थिक नुकसान होऊ शकते. तणाव, चिंता टाळा.

कन्या- लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनाल. नोकरीत वाढ होऊ शकते. भाग्य आणि आर्थिक लाभ मजबूत होईल. घाईत निर्णय घेऊ नका.

तुळ- आर्थिक नुकसान होऊ शकते. पैसे उधार देणे, गुंतवणुक करणे टाळा. रोमान्ससाठी चांगला काळ. पार्टनरच्या आणि स्वताच्या प्रकृतीची काळजी घ्या.

वृश्चिक- आरोग्याकडे लक्ष द्या. जोडीदाराशी वाद टाळा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आध्यात्माचा अनुभव करू शकता. मेडिटेशनने मानसिक तणाव दूर होईल.

धनु- वाणीवर नियंत्रण ठेवा. वाद-विवाद टाळा. भावना चांगल्याप्रकारे व्यक्त करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. निद्रानाशसारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात.

मकर- आर्थिक लाभ होईल. प्रेमा गोडवा वाढेल. यश मिळेल. पार्टनरशी संबंध बिघडू शकतात. धैर्य राखा, मेडिटेशन करा.

कुंभ- जीवनात कुणी नवीन क्रश येण्याची शक्यता आहे. व्यापारात चढ-उतार राहील. वेळ खुप चांगली नाही. कामात सामंजस्य ठेवा. प्रवास टाळा, आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन- मोठे बदल टाळा. आई आणि मुलांच्या आरोग्याच्या देखभालीची जास्त गरज आहे. वाद-विवाद टाळा. चर्चेतून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.