Chandrakant Khaire | गडकरींची भाजपमध्ये घुसमट होतेय, चंद्रकांत खैरेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते (BJP) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भाजपमध्ये घुसमट होत असल्याचा दावा ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. याबाबत गडकरी माझ्याशी बोलले होते मात्र ते माझ्याशी बोललेलं वाक्य मी कधीही सार्वजनिक करणार नाही, असं सूचक विधान चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलं आहे. शिव गर्जना यात्रेच्या (Shiva Garjana Yatra) निमित्ताने ते नागपूर दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. खैरे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गडकरींना बाजूला केले जाणार

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पुढे म्हणाले, संघ परिवार गडकरी यांच्या पाठीशी असल्याने प्रकाश जावडेकरांच्या (Prakash Javadekar) वेळेला गडकरींना मंत्रिपदावरून बाजूला केलं गेलं नाही. परंतु आता गडकरींच्या गोटातून अशी अफवा आहे की गडकरींना बाजूला केले जाणार आहे, असे खैरे यांनी सांगितले. भाजप श्रेष्ठींनी तसे केले तर योग्य होणार नाही. गडकरी सारख्या व्यक्तीला बाजूला करणे चुकीचे ठरेल असेही खैरे यांनी सांगितले.

गडकरी-ठाकरे यांच्यात भेट झाली

भाजपमध्ये नितीन गडकरींना खरंच बाजूला केले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तुम्ही त्यांच्यासोबत उभारणार का? या प्रश्नावर बोलताना खैरे म्हणाले, नितीन गडकरी मागे उद्धव ठाकरे यांना भेटले होते, असे सूचक विधान करताना ते नेहमीच भेटत असतात असेही खैरे म्हणाले.

ओवेसींच्या बोलण्याने काही होणार नाही

ओवीसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात असणारे मुस्लिम उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. आम्ही एमआयएमच्या (MIM) विरोधात असून आम्ही त्यांच्याकडे जाणार नसल्याचे खैरे यांनी सांगितले. तसेच एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. मुंब्र्यातील सर्व मुस्लिम जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे ओवीसींच्या बोलण्याने काहीही होणार नसल्याचे खैरे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री

कोणत्याही स्थितीत उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टात न्याय मिळू दे असे आमचे देवाला साकडे आहे.
एकदा 16 आमदार अपात्र ठरले की त्यांची काय अवस्था होते ते पहा असे खैरे म्हणाले.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे घटनाबाह्य मुख्यमंत्री असून ते आनंद दिघे (Anand Dighe) यांचे
नाव घेतात. मात्र आनंद दिघे यांनी असे कधीही केले नाही.
आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांशी (Balasaheb Thackeray) गोड बोलून जवळीक साधल्याचे खैरे यांनी सांगितले.

Web Title :- Chandrakant Khaire | shivsena chandrakant khaire comment on minister nitin gadkari