Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शनीदेव हे देवांचे कायदामंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यामुळे संजय राऊतांच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे प्रार्थन केली होती, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सांगितले. संजय राऊत हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आहेत, ते कितीही दबाव आला तरी दबले नाही. ते बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) शिवसैनिक (Shivsainik) असल्याचे संजय राऊत यांनी दाखवून दिले. त्या ४० गद्दारांनी यातून उदाहरण घ्यावं, ज्यांनी दबाव टाकला ते आता उघडे पडले. हा सत्याचा विजय असून राऊतांना मिळालेला हा एकनिष्ठेचा जामीन असल्याचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी म्हटले आहे.

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयाने जामीन मंजूर केला. अखेर १०२ दिवसांनी संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. मात्र, यातच संजय राऊत यांची सुटका व्हावी, यासाठी शनीदेवाकडे साकडे घातले होते, पूजा केली. त्यामुळे आता संजय राऊतांनी कुटुंबासह शनी-शिंगणापूरला (Shani Dev) येण्याचे कबुल केले आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दिली.

 

दरम्यान संजय राऊत यांना जामीन देताना विशेष न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर ताशेरे ओढले.
संजय राऊत आणि प्रवीण राऊतांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. प्रवीण राऊतांना फक्त दिवाणी वादासाठी अटक करण्यात असून संजय राऊतांना तर कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद राहिली आहे. ईडीनेही हे त्यांच्या तक्रारीत मान्य केले आहे.
तरीदेखील म्हाडाच्या एकाही अधिकाऱ्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही.
ठराविक लोकांनाच अटक करण्याची ईडीची वृत्तीच दिसून येते, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

 

Web Title :- Chandrakant Khaire | shivsena thackeray group chandrakant khaire said worshiped shani dev for sanjay raut bail and he will come to shani shingnapur with family

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Mahesh Tapase | भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे का? – महेश तपासे

Pune Crime | बंडगार्डन आणि फरासखाना पोलीस ठाण्यच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मॅस्केलाईन आणि एमडी जप्त