Chandrakant Patil | ‘सुप्रिया ताई, तुम्ही काळजी करु नका, हे मुख्यमंत्री…’, चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव (Ganeshotsav) काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील अनेक मंडळातील गणेश मूर्तींचे दर्शन घेतले. गणेशोत्सवातील 10-11 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती दर्शनासाठी अनेक मंडळांना भेटी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या गणेश मंडळाच्या (Ganesh Mandal) भेटीवरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी ‘राज्याला दोन मुख्यमंत्री पाहिजेत’ अशा शब्दात टीका केली होती. या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कल्याण तालुक्यातील गोवेली येथील एका शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते.

 

यावेळी भाजपचे आमदार किसन कथोरे (BJP MLA Kisan Kathore), कुमार आयलानी (Kumar Ailani), माजी आमदार नरेंद्र पवार (Former MLA Narendra Pawar) आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे (Jeevandeep Education Institute) अध्यक्ष रविंद्र घोडविंदे (Ravindra Ghodvinde) उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, अतिशय व्यवस्थित प्रशासन सुरु आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याला दोन-दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. सुप्रिया ताई, तुम्ही काळजी करु नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सरकार पण चालवतील आणि फिरतीलही, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कौशल्य विकास (Skill Development) विषयक शिक्षणावर भाष्य केलं.
शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. इतकेच नाही तर बीए, बीएस्सी करुन चालणार नाही.
हे सामान्य ज्ञान आहे. ती एक समाजाची छोटी गरज आहे. बीएस्सीसोबत कौशल्य विकास केला पाहिजे.
त्यामुळे ज्ञान आणि कौशल्य वाढेल. याचा फायदा तरुणांना रोजगारासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader minister targets ncp supriya sule on cm eknath shinde comment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nitin Gadkari | ‘मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, सरकारच्या भरवश्यावर राहू नका’, नितीन गडकरींची टोलेबाजी (व्हिडिओ)

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या