Chandrakant Patil | दसरा मेळावा कोणाचा होणार?, चंद्रकांत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर महापालिका निवडणुकीची (Municipal Election) रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेने (Shivsena) आज बैठक घेतली. यातच, काही दिवसांवर येवून ठेपलेल्या दसरा मेळाव्यावरुन (Dussehra Melava) शिंदे गट (Shinde Group) विरुद्ध ठाकरे गट (Thackeray Group) यांच्या वाद रंगला आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यावर आपलाच हक्क असल्याचा दावा केला आहे. यावर भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केलं आहे.

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुनही शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असून दसरा मेळावा आमचाच असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट शब्दात बोलणं टाळलं.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, हा दोन पक्षाचा खासगी विषय आहे. त्यामध्ये माझ्यासारख्या त्रयस्त माणसाने मत मांडणे बरोबर नाही. नगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अहमदनगर उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट येथील नियोजीत इमारतीचे भूमिपूजन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil)
आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून नवीन शैक्षणिक धोरणाची देशभर अंमलबजावणी सुरु आहे.
मात्र, मागील अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt)
केंद्राशी असहकार पुकारुन त्याची अंमलबजावणी केली नाही.
आता लोकांच्या मनातील सरकार आल्याने जोमाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करु,
असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patal made it clear that shiv senas battle was on after the dussehra rally of mumbai shivtirth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

 

Varsha Usgaonkar | …तर वर्षा उसगांवकरांना सडके मासे खाऊ घालू

 

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड