Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर रात्री व्हिडिओ काढणाऱ्या ‘या’ पक्षाच्या कार्यकर्त्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रात्री बारा वाजता त्यांच्या कोथरूडमधील बंगल्याच्या बाहेर व्हिडिओ रेकॉर्ड (Video Record) केल्याप्रकरणी काँग्रेसचा कार्यकर्ता संदीप कुदळे (Congress Worker Sandeep Kudale) याला अटक केली आहे. कुदळे याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक (Arrest) केली. कुदळे याने दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या व्हिडिओमध्ये या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा निषेध केला आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुले (Mahatma Phule) यांचे साहित्य वाचावे, असे आवाहन केले. तसेच त्यांच्या कार्याचं चिंतन करावं, असा सल्लाही दिला. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबतीत चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून सगळीकडे राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणानंतर त्यांच्या दौऱ्याच्यावेळी आणि
ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला पौलीस तैनात करण्यात येणार आहेत.
आज ते अनेक ठिकाणी कामानिमित्त भेटी दौरा करणार आहेत.
त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

Web Title :- Chandrakant Patil | congress member arrested for making video in front of chandrakant patil house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update