Rajinikanth | रजनीकांत यांचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा ; म्हणाले “मराठीत काम करण्याची संधी मिळाली होती पण…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तामिळ चित्रपटसृष्टीत उच्च स्थानावर ज्यांचे नाव घेतले जाते असे अभिनेते म्हणजे रजनीकांत (Rajinikanth). रजनीकांत यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. फक्त भारतातच नाही तर परदेशातदेखील त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘रोबोट’, ‘कबाली’, ‘शिवाजी’, ‘अन्नाते’ लिंगासारख्या एक न अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे,. तर त्यांच्या अनेक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आज रजनीकांत (Rajinikanth) यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने त्यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे,

 

2020 साली ‘दरबार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रजनीकांत जेव्हा मुंबईत आले त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले होते की “मला मराठी चित्रपटसृष्टीत देखील काम करण्याची इच्छा आहे. एक काळ असा होता जेव्हा मला मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, काही गोष्टी घडून आल्या नाहीत म्हणून माझी इच्छा अपूर्णच राहिली आहे. मला अजूनही मराठी चित्रपटामध्ये काम करायची इच्छा आहे. ” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित थक्क राहिले.

अभिनयासोबतच सामाजिक कार्यामुळे रजनीकांत (Rajinikanth) यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
रजनीकांत यांचे पूर्ण नाव शिवाजी गायकवाड असे आहे. थलावया अशी त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख आहे.
रजनीकांत चित्रपटातून दरवर्षी सुमारे 50 ते 60 कोटींची कमाई करतात.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी ते कर्नाटकमध्ये बस वाहकाचे काम करत होते.
अभिनयाची आवड असल्याने ते चित्रपटसृष्टीत दाखल झाले. रजनीकांतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ते सध्या ‘जेलर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार करीत आहेत. या चित्रपटातील रजनीकांतचा लुक आउट करण्यात आला आहे.
या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनदेखील दिसणार आहे. त्याचबरोबर शिव कार्तिकेयन, प्रियांका अरुल मोहन, रम्या कृष्णन हेदेखील कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

 

Web Title :- Rajinikanth | superstar rajanikanth confessed that he got opportunity to work in marathi film

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांना सन्मति दे भगवान प्रार्थना ! पत्रकारांवरील दबावाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुक आंदोलन

IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या 15 इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक

Pune Crime | पत्नी अन् तिच्या कुटुंबाच्या त्रासाला वैतागून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर FIR; मुंढवा परिसरातील घटना