Chandrakant Patil | स्वत:च्या अंगावर शाई ओतून पुण्यात अनोखं आंदोलन; कारण ठरले चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात 11 पोलिसांचे निलंबन (Police Suspended) करण्यात आले, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. तसेच याच प्रकरणात एका पत्रकारालादेखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणावर अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान पुण्यात एक अनोखं आंदोलन (Agitation) झाल्याचं पाहायला मिळाले. पोलिसांवर निलंबनाची कारवाई आणि पत्रकाराला चौकशीसाठी ताब्यात घेणे ही लोकशाहीची गळचेपी असून, त्याच्या निषेधार्थ हेमंत ढमढेरे (Hemant Dhamdhere) यांनी स्वत:च्याच अंगावर शाई फेकून घेत अनोख्या पद्धतीने निषेध केला.

 

महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jotiba Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानामुळे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक (Ink Throwing) करण्यात आली. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 11 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर एका पत्रकाराला व्हिडिओ काढल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते.

 

महामानवांविरोधात बोलता आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करता, हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे सांगत महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी आपल्या स्वत:च्या अंगावर शाई फेकून सत्ताधारी मंत्री व प्रशासनाच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. तसेच महामानवांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून त्यांनी स्वत:च्याच अंगावर शाई ओतून घेतली.

 

आंदोलनाचा मार्ग वेगळा अवलंबला तर पोलीस सत्तेच्या दबावापुढे कारवाई करतात.
त्यामुळे मी स्वत:च्याच अंगावर शाई ओतून या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध करीत असल्याचे ढमढेरे यांनी सांगितले.
हेमंत ढमढेरे यांनी स्वत:च्याच चेहऱ्यावर शाई ओतून या घटनेचा अनोख्या पद्धतीने केलेला निषेध पुण्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | in protest of chandrakant patil hemant dhamdhere poured ink on himself

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार