Chandrakant Patil On Hinjawadi | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिंजवडी गावातील सुविधांचा आढावा

पुणे : Chandrakant Patil On Hinjawadi | हिंजवडी गावातील कस्तुरी चौक, वाकड उड्डाणपूलाजवळील वाढते वायरचे जाळे तसेच लावण्यात आलेले जाहिरात फलक याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. (Chandrakant Patil On Hinjawadi )

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहूल महिवाल (IAS Rahul Ranjan Mahiwal), हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे (Hinjawadi Industries Association) मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल सी.एस. भोगल (Col Charanjeet S. Bhogal), एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख (MIDC Sanjay Deshmukh) उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, या भागातील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात यावेत. आवश्यकता भासल्यास फलक काढताना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी. सीसीटीव्ही (CCTV) कार्यान्वित करण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करुन एमआयडीसीने संपूर्ण खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्यास संबंधितांना नोटीस बजवावी.
एमआयडीसी हिंजवडी (Hinjewadi MIDC) मध्ये बांधण्यात आलेला नवीन उड्डाणपूल वाहतूकीस लवकरात
लवकर सुरु होईल याचे नियोजन करावे. खाजगी एजन्सीच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी कचऱ्याची समस्या, वाकड चौकातील वाहतुकीची समस्या (Wakad Chowk Traffic),
सर्कल- नांदेड रोड (Circle- Nanded Road), माण रोड (Man Raod), आदीबाबतही आढावा घेण्यात आला.

Web Title :-  Chandrakant Patil On Hinjawadi | A review of facilities in Hinjewadi village by Guardian Minister Chandrakant Patil

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Political News | शरद पवार भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच करु, भाजपच्या मंत्र्याचं सूचक विधान
Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला