Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Pune Police | देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यातून दोन आरोपींना (Pune Crime News) ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातून मंगळवारी पहाटे दोघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोघेजण मागील दीड वर्षापासून मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) आहेत. पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. पुणे पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन अभिनंदन केले आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे.(Chandrakant Patil On Pune Police)

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन या दोन कर्तबगार पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईवर पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! कोथरुडमध्ये संशयास्पद रितीने वावरणाऱ्या दोघांना काल कोथरुड पोलिसांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेऊन ATS कडे सुपूर्द करण्यात आले आहे. या दोन्ही संशयितांच्या सखोल चौकशीअंती मोठी माहिती समोर येईलच. कोथरूडमधील जनता सुरक्षित रहावी यासाठी सदैव कर्तव्यदक्ष असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) सलाम! (Chandrakant Patil On Pune Police)

 

 

काय आहे प्रकरण?

मंगळवारी पहाटे कोथरुड पोलीस ठाण्यातील (Kothrud Police Station) कर्मचारी गस्त घालत असताना कोथरुडच्या बधाई चौकात दुचाकी चोरी करताना तीन तरुण दिसून आले. त्यावेळी कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण (Pradeep Chavan) आणि अमोल शरद नझन (Amol Sharad Nazan) यांनी त्या तीघांना पकडले. मात्र, एकजण तेथून पळून गेला. चव्हाण आणि नझन यांनी दोघांना पकडून ठेवले आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन आले. मोहमद युनूस साकी (Mohammad Yunus Saki) व इम्रान खान (Imran Khan) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

पुणे पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये हे दोघेजण राजस्थानातील
(Rajasthan) मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार (Most Wanted Criminals) असल्याचे समोर आले.
याबाबत पुणे पोलिसांनी एनआयए तसेच इतर तापस यंत्रणांना याची माहिती दिली.
या दोघांवर एनआयएकडून (NIA) 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
आरोपी दहशतवादी इसिसच्या (ISIS) सुफा संघटनेचे सदस्य (Sufa organization member) असल्याचा संशय आहे.

 

Web Title : Chandrakant Patil On Pune Police | Good luck! Appreciation of Pune Police by Guardian Minister Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा