Chandrapur Crime News | चंद्रपुरातील धक्कादायक घटना! प्रसिद्ध डॉक्टराचा स्वतःच्या रुग्णालयात आढळला मृतदेह

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrapur Crime News | चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञाचा स्वतःच्या रुग्णालयात मृतदेह (Dead Body) सापडल्याने सर्वत्र खळबळ (Chandrapur Crime News) उडाली आहे. नेत्ररोग तज्ज्ञ (Ophthalmologist) डॉ. उमेश अग्रवाल (Dr. Umesh Aggarwal) यांचा त्यांच्या साई आय हॉस्पिटलमध्ये (Sai Eye Hospital) मृतदेह आढळला आहे. मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत रुग्णावर शस्त्रक्रिया (Surgery) केल्यानंतर थकलो असल्याचे सांगत हॉस्पिटल स्टाफला झोपतो असे सांगून उठवू नका, असा निरोप त्यांनी दिला. तासाभरानंतर कुठलीही हालचाल न जाणवल्याने स्टाफने केबिनमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये डॉ. उमेश अग्रवाल मृतावस्थेत आढळले.

याबाबत माहिती अशी की, चंद्रपूर शहरातील (Chandrapur Crime News) आझाद बगीचा जवळच्या मुख्य रस्त्यावर डॉ. उमेश अग्रवाल यांचे रुग्णालय आहे. त्याच रुग्णालयाच्या वर त्याचे घर आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी आपल्या स्टाफला थकलो, असे सांगितले आणि वर असलेल्या त्यांच्या घरी जाऊन झोपले. साधारण एक तासानंतर एक रुग्ण आला. कन्सल्टेशन गरजेचे असल्याने स्टाफने डॉ. उमेश अग्रवाल झोपलेल्या खोलीत जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उठले नाहीत, त्यांचा श्वासोच्छवासही (Breathing) थांबला होता. त्यांचा मृत पावल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट झाल्यानंतर बाकीच्या हालचाली करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

डॉक्टर अग्रवाल यांच्या पत्नी देखील डेंटिस्ट (Dentist) आहेत. तर मुलगा डॉक्टरकीच्या अंतिम वर्षाला आहे. दरम्यान, डॉ. अग्रवाल हे गेल्या एक ते दीड वर्षांपासून डिप्रेशनमध्ये (Depression) होते अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवले असावे अशी शंका आहे. पण शवविच्छेदन अहवालातून अधिकृत माहिती समोर आल्यावर नेमका मृत्यू (Death) कशामुळे झाला हे समजणार आहे.

Web Title :  Chandrapur Crime News | dead body of a famous ophthalmologist in chandrapur was found in his own hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा