Chandrasekhar Bavankule | ’14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?’

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कोरोनाच्या काळात तब्बल चौदा महिने मंत्रालयात आलेच नाहीत. मग मंत्रालयात इतका काळ न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?, असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी उपस्थित केला आहे. या सवालावरून बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी बावनकुळे यांनी बुलडाण्यात (Buldana) माध्यमांशी सवांद साधला.

त्यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्कृष्ट ठरवणारे सर्वेक्षण कोणी केले हे माहीत नाही.
देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विकासाची कामे केली.
हे पाहता राज्यातील 12 कोटी जनतेला विचारणे गरजेचे आहे की, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण आहे? असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत प्रश्नम या संस्थेने सर्वेक्षण (Survey) करून एक रिपोर्ट (Report) सादर केला आहे.
या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण अशा राज्यांची निवड करण्यात आली होती.
दरम्यान, भारतातील एकूण 13 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अव्वल स्थान दिलं गेलं आहे. यावरूनच भाजपने हल्लाबोल केला आहे.

 

Web Title : Chandrasekhar Bavankule | the bjp has asked the question of how the chief minister who has not been in the mantralaya for 14 months is excellent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Pune | पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

Pune | पुण्यात बेरोजगार झालेल्यांना मिळणार रोजगाराची संधी ! पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकर, जाणून घ्या

How to Avoid UPI Fraud | ‘युपीआय’द्वारे पेमेन्ट करताना होऊ शकतो फ्रॉड, ‘या’ 3 सोप्या पद्धतीने करू शकता बचाव; जाणून घ्या