Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar | ‘अजित पवार लांडग्याचं लबाड पिल्लू’, पडळकरांच्या विधानावर बावनकुळेंनी मागितली जाहिर माफी, म्हणाले – ‘मी दिलगिरी व्यक्त करतो, अजित पवारांनी मोठ्या…’

Gopichand Padalkar - Ajit Pawar | BJP MLA gopichand padalkar called ajit pawar wolfs cub sent defamation notice 7 day ultimatum asim sarode marathi news

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लु आहे, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली होती. पडळकरांच्या या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. पडळकरांच्या या विधानानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असून अजित पवारांचे समर्थक नेते आक्रमक झाले आहेत. पडळकर यांनी केलेल्या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे. अजित पवारांनी मोठ्या मनाने पडळकर यांना माफ करावं, असंही बावनकुळे म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar)

मी दिलगिरी व्यक्त करतो

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांनी केलेलं विधान संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भाजप कधीही याचं समर्थन करणार नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. एखाद्याशी आपलं पटत नसेल अथवा महायुतीत असून आपले विचार वेगळे असतील. तुमचे मतभेद असतील. पण मनभेद तयार करुन व्यक्तीगत टीका-टिप्पणी करणं, हे राज्याच्या संस्कृतीला धरुन नाही. भाजपच्या संस्कृतीलाही हे शोभणार नाही. यामुळे गोपीचंद पडळकर हे अजित पवारांबद्दल जे काही बोलले आहेत, त्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. (Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar)

अजित पवारांनी मोठ्या मनाने माफ करावं

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, आपलं कितीही वैर असलं तरी पडळकर यांच्यासारखं कुणीही कोणत्याही नेत्याबद्दल बोलू नये. कितीही मतभेद असले तरी सार्वजनिकपणे कोणाचा अपमान करणे, आपल्या रक्तात नाही. विरोधी पक्ष असला तरी त्यांच्यावर संस्कारमय पद्धतीने टीका केली पाहीजे. पक्षीय राजकारणात टीका केली जाऊ शकते. मात्र, व्यक्तीगत टीका केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पडळकर जे काही बोलले आहेत, त्यांना अजित पवार यांनी मोठ्या मनानं माफ करावं. मी अजित पवारांना यासंदर्भात बोलणार आहे.

Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar

मी क्षमा मागतो

गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, गोपीचंद पडळकरांना आम्ही सांगितलं आहे की, यापुढे अशा पद्धतीने विधाने करू नयेत. एका जबाबदार विधानपरिषद सदस्याने अशा प्रकारे बोलू नये. ते भाजपचे जबाबदार नेते आहेत. पण त्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवारांचे मन दुखावले आहे, त्यासाठी मी क्षमा मागतो.

काय म्हणाले पडळकर?

गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही.
म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत.
अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही.
त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

Total
0
Shares
Related Posts