Chandrashekhar Bawankule | छोटे पक्ष फोडा आणि संपवा! चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना धक्कादायक आवाहन

नागपूर : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या (BJP) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते (Union Minister Faggan Singh Kulaste) यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गाव, शहरातील छोटे पक्ष फोडा आणि संपवा, असे धक्कादायक आवाहन पदाधिकाऱ्यांना केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आपआपल्या जिल्ह्यातील छोटया पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विविध पक्षांचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथ प्रमुखांनी आपल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षांच्या किमान ५० पदाधिकांऱ्यांना आपल्या पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा.

बावनकुळे म्हणाले, पक्षाने मला काय दिले यापेक्षा पक्षासाठी मी काय करु शकतो याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावा. आपल्या गळ्यातील दुपट्टा हेच आपल्यासाठी प्रमाणपत्र आहे. पक्षावर किंवा नेत्यावर नाराज होऊन काही उपयोग नाही. आपण नाराज असाल आणि काम करत नसाल तर आपली जागा दुसरे कुणी तरी घेईल. प्रत्येक आमदाराने १५ हजार तर खासदारांनी ३० हजार लोकांपर्यत नमो अ‍ॅप पोहचवायचे आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, भाजपचे मित्रपक्ष असलेल्या छोट्या पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वापरा आणि फेका हे भाजपचे तत्त्व असल्याचे त्यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अंमली पदार्थाच्या विरोधात पुणे पोलिसांची देशातील मोठी कारवाई, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांना 25 लाखांचे बक्षीस