Chandrashekhar Bawankule | ‘…त्यामुळेच ते दुसऱ्यांवर टीका करतात’; चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा विश्वासघात डॉ.सुधीर तांबे यांनी केला. असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसेच त्यांनी याप्रकरणात भाजप समाविष्ट असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. (Chandrashekhar Bawankule)

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते की काँग्रेस हे डूबते जहाज आहे त्यामुळे त्यावर कोणी बसायला तयार नाही. अमित देशमुख यांनी मी ज्या घरात आहे त्याच घरात राहणार आहे असे सांगितले असले तरी काळ ठरवेल. असे सूचक वक्तव्य देखील यावेळी बोलताना त्यांनी केले आहे. जर तरला अर्थ नाही म्हणत २०२४ मध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना उमेदवार देखील मिळणार नाही. असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच, सत्यजीत तांबे यांनी अजून आम्हाला पाठिंबा मागितला नाही.
जर ते आमच्याकडे आले तर आमच्या राज्य आणि केंद्रीय संसदीय मंडळाकडे हा विषय जाईल आणि
याबाबतचा निर्णय ते घेतील. आमच्या देखील तिन्ही उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र त्यांना एबी फॉर्म देण्यात आले नाही. असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षाला चिमटा काढला.

दरम्यान, काल नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला.
त्यानंतर सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावेळी आले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
एक सूचक वक्तव्य केले होते. तेच खरे करत त्यांनी काँग्रेस पक्षाला धक्का दिला की काय.
अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | congress cannot manage people criticism of chandrasekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या

Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक