Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Unauthorized School | राज्य सरकारची मन्यता न घेता इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium Schools) सुरु करण्याचे प्रकार समोर येत असल्याने पुणे जिल्ह्यातील 13 अनधिकृत शाळांविरोधात (Pune Unauthorized School) गुन्हे (FIR) दाखल करा. असे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत दौंड, मुळशी, पुरंदर आणि हवेली तालुक्यातील शाळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्यात सातशेपेक्षा जास्त अनधिकृत शाळा (Pune Unauthorized School) असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 43 शाळा अनधनिकृत असल्याचे उघड झाले होते.
त्यानंतर या शाळांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून तपासणी करण्यात आली.
यात 29 शाळा बंद असल्याचे आढळून आले तर 14 शाळा सुरु असल्याचे आढळून आले.
कायद्यामधील तरतुदीनुसार या शाळांना दंड आकारण्यात आला. त्यापैकी चार शाळांनी प्रत्येकी एक लाख
रुपये दंडाची रक्कम जिल्हा परिषदेकडे भरली.

या शाळांवर कारवाई होणार

या 13 शाळा हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणीकाळभोर, आंबेगाव बुद्रुक; तसेच मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी या ठिकाणच्या आहेत. दौंड तालुक्यातील दौंड, कासुर्डी,
लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यातील वीर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा यात समावेश आहे,
असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title :- Pune Unauthorized School | pune zilla parishad education officers order to file a case against 13 unauthorized schools in pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kanjhawala Accident Case | अंजली सिंह अपघातप्रकरणी 2 पोलीस उपनिरीक्षक, 4 सहायक उपनिरीक्षक, 4 हेड कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबल निलंबीत

Amol Mitkari | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा भाजप खासदार किरीट सोमय्यांवर निशाणा

Amit Deshmukh | भाजप प्रवेशाबाबत स्पष्टचं बोलले अमित देशमुख; म्हणाले…