‘चांद्रयान २’ नंतर आता इस्रोची सूर्यावर नजर ; २०२० च्या मध्यात लाँच होणार ‘आदित्य L1’ मिशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रोची नजर सूर्याकडे असणार आहे. २०२० च्या मध्यापर्यंत ‘आदित्य एल १’ हे सूर्याचा अभ्यास करणारे मिशन इस्रो लाँच करणार आहे. या मिशनचा उद्देश सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान ६००० केल्विन पेक्षा कोरोनाचे तापमान ३०० पट जास्त का आहे ? कोरोना हा सूर्याचा एक भाग आहे. सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरील भाग म्हणून कोरोना ओळखला जातो. हा भाग सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे दिसून येत नाही.

इस्रोने आपल्या वेबसाइटवर याविषयी माहिती दिली आहे. सूर्याच्या या बाहेरील भागाला ‘तेजोमंडळ’ असे म्हटले जाते. हे तेजोमंडळ हजारो किलोमीटरपर्यंत पसरले आहे.

 ‘आदित्य एल १’ तेजोमंडळाचे विश्लेषण करेल

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन म्हटले की, आदित्य L १ पृथ्वीपासून १.५ मिलियन किलोमीटर इतक्या लांब स्थिरावेल. तेथून याची नजर सूर्यावर असेल. याचा वातावरणीय बदल यावर विशेष परिणाम आहे.

 ‘आदित्य एल १’ असा करेल अभ्यास

रिपोर्टच्या माहितीनुसार, आदित्य L १ सूर्याच्या फोटोस्फेयर, क्रोमोस्फेयर आणि तेजोमंडल चा अभ्यास करेल. आदित्य L १ कडून सूर्याकडून येणाऱ्या विस्फोटक कणांचा देखील अभ्यास करण्यात येईल. इस्रोच्या नुसार हे कण पृथ्वीच्या खालील कक्षेत काही कामाचे नसतात. या कणांना चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर ठेवण्याची गरज आहे.

आरोग्यविषयक वृत्त