Income Tax Refund लवकर मिळवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ उपाय, अन्यथा होईल विलंब

नवी दिल्ली : Income Tax Refund | इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Refund) दाखल करण्याची गरज प्रत्येक त्या टॅक्सपेयरला पडते, ज्यांचे इन्कम टॅक्सेबल असते. तसेच, इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केल्यानंतर योग्य लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसुद्धा मिळतो. मात्र, अनेकदा आयटीआर रिफंड मिळण्यामध्ये विलंबाचा सामना करावा लागतो. इन्कम टॅक्स रिफंड लवकर मिळवण्यासाठी असलेले उपाय जाणून घेऊया (Income Tax Return Filing).

योग्य फॉर्म निवडा

इन्कम टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी टॅक्सपेयर्सने काही मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे. यासाठी योग्य आयटीआर फॉर्मची निवड करावी. योग्य फॉर्मचा वापर हे निश्चित करतो की, रिटर्न विना अडथळा भरला गेला आहे. चुकीचा फॉर्म दाखल केल्याने अतिरिक्त तपासणी आणि उशीर होऊ शकतो. (Income Tax Refund)

योग्य माहिती द्या

तसेच, आयटीआरमध्ये अचूक आणि पूर्ण माहिती असावी. कोणत्या त्रुटीमुळे उशीर होऊ शकतो आणि प्रश्न उपस्थित होऊ शकतात. टॅक्सपेयर्सने आपले पॅन कार्ड, बँक डिटेल आणि कॉन्टॅक्ट सारख्या डिटेलची पुन्हा एकदा पडताळणी करावी. सोबतच ठरलेल्या तारखेपूर्वी आयटीआर दाखल केला पाहिजे. वेळेवर दाखल केल्याने आयटी विभागाला सुद्धा यावर प्रोसेस करण्यास पुरेसा कालावधी मिळतो. यामुळे रिटर्न ताबडतोब प्रोसेस होतो.

इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन

जर तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते आधारसोबत जोडलेले असेल, तर ई-व्हेरिफिकेशन कोड पर्याय वापरा.
जर नेट बँकिंग सक्षम असेल, तर पोर्टल बँकेच्या साईटवर रिडायरेक्ट करेल.
ऑनलाईन फायलिंग आणि ई-व्हेरिफिकेशन विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन फायलिंग
वेगवान आहे. रिटर्न दाखल केल्यानंतर ताबडतोब ई-व्हेरिफिकेशन केले पाहिजे.
रिफंडसाठी बँक खात्याची पूर्व-पडताळणी केल्याने हे निश्चित होते की रिफंड रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांनी कांद्याबाबत 6 प्रश्न विचारत सरकारला घेरलं, म्हणाले- ‘सरकारची अशी ही बनवाबनवी…’