क्रेडिट, डेबिट कार्डवर मिळणार बेस्टचे तिकीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

प्रवासी संख्या वाढण्यासाठी तसेच सुविधामध्ये सुधारणा होण्यासाठी बेस्ट नवीन उपक्रम सुरु करत आहे. त्यानुसार आता बेस्ट बसची संख्या वाढवण्यात येणार असून तिकीट प्रणालीतही बदल करण्यात येणार आहेत.

तिकीट प्रणालीतील बदल –

बेस्टच्या परिवहन विभागातील तिकीट यंत्रणा टीकेचे केंद्र ठरली आहे. मशिनच्या कमतरतेचाही उपक्रमास फटका बसत आहे. त्यामुळे बेस्टने तिकीट वाटप यंत्रणेत सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना येणार्‍या वर्षात क्रेडीट व डेबिट कार्डद्वारे तिकीट काढता येईल अशी घोषणा बेस्टच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने केली आहे. त्यामुळे प्रवाशांना भासणार्‍या सुट्या पैशांचा प्रश्न निकाली निघणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56cbf798-cb9a-11e8-bcbd-db64811d013f’]
त्याशिवाय भविष्यात येणार्‍या तंत्रज्ञानातील सुधारणा लक्षात घेऊन, बेस्ट उपक्रमाद्वारे विकसित करण्यात येणार्‍या तिकीट प्रणालीमध्ये क्युआर कोड, क्रेडीट व डेबिट कार्ड स्वाईप सुविधा, ऑनलाईन व्यवहार, मोबाईल तिकीट, वायफाय तंत्रज्ञान आदी अद्ययावत सुविधा प्राधान्याने देण्याचे नियोजित असल्याचे प्रशासनाने अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B017NU6LZM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79a26d6d-cb9a-11e8-b521-677a79bdfc93′]

बस ताफा वाढवणार –

बेस्टची आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्यामुळे नविन बस खरेदीसाठी तिजोरीत निधीच नाही. त्यामुळे बेस्टचा ताफा ३ हजार २०० पर्यंत खाली आला आहे. हा ताफा वाढवण्यासाठी बेस्टचा प्रयत्न राहणार आहे. पालिका, राज्य सरकार यांच्या अर्थसहाय्यातून २०२० पर्यंत बेस्टचा ताफा ४५०० पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

अचूक वेळेसाठीही प्रयत्न-

थांब्यावर बस नेमकी केव्हा येणार याची अचूक वेळ कळण्यासाठीदेखील बेस्टकडून प्रयत्न केले जाणार आहेत. इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या आधारे राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पात आगार, बसस्थानक, चौकी आदींचे संगणकीकरण केले जाणार आहे.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B077RTXJ66′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02a90266-cb9b-11e8-9047-f7e206008f12′]