वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का ? : आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – वन खात्याचं नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे असे वक्तव्य करत टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वन मंत्रालयावर टीकेचे ताशेरे आेढले आहेत. आज अवनीला ठार केलं. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला. इतकेच नाही तर वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता नसली आली का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

का झाली अवनी नरभक्षक ? कोणी घेतला तिचा शोध ?

यवतमाळमध्ये काही दिवसांपासून नरभक्षक वाघीण  अवनी अर्थात टी-१ या वाघिणीचा वावर होता. अनेक दिवसांपासून तिचा शोधही सुरू होता. परंतु आता अवनी अर्थात टी-१ हीला मारण्यात वनविभागाच्या चमूला यश आलंय. अवनीच्या मृत्यूनंतर यवतमाळमधली तिची दहशत संपली खरी. मात्र अवनीच्या मृत्यूबाबत वन्यजीव प्रेमीनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. शिकारी नवाब शाफत अलीचा मुलगा असगर यानं अवनीचा वेध घेतला. आपल्या दोन बछड्यांसोबत  यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावच्या जंगलात गेल्या काही महिन्यांपासून तिचा वावर होता. अपूरे जंगल, शिकारीची कमतरता आणि बछट्यांच्या सुरक्षेसाठी अवनी नरभक्षक झाली.

अवनीला शोधण्यासाटी टी-१ मोहीम सुरु झाली. मात्र सुरुवातीपासूनच ही मोहीम वादात अडकली. वनविभागाकडे शार्प शूटर्स असतानाही अवनीला पकडण्यासाठी किंवा मारण्याठी वनविभागानं कुख्यात शिकारी नवाब शाफत अली खानची नेमणूक केली. या परिसरात १४ जणांची शिकार केल्याचा आरोप अवनीवर ठेवण्यात आला. काहींच्या मृतदेहात अवनीचे डिएनए आढळले आणि अवनीला जिवंत पकडा किंवा दिसताक्षणी गोळी घाला असे आदेश देण्यात आले.

असा घेतला अवनीचा वेध घेतला ?

बोराटीच्या जंगलात तिच्या पावलांचे ठसे दिसल्यानंतर नागपूरच्या महाराजाबाग मधील वाघीणीचं मूत्र जंगलात शिंपडण्यात आलं. त्याच्या वासानं अवनी शुक्रवारी रात्री जंगलातील वाघडोट्टा भागात आली आणि रात्री अकराच्या सुमारास नवाब शाफत अलीखानचा मुलगा असगर यानं अवनीचा वेध घेतला. अनेक दिवसांपासून टी-१च्या शोधासाठी हत्ती, पॅराग्लायडर्स, शिकारी कुत्रे यांची मदत घेतली खरी मात्र अवनी साऱ्यांना चकवा देतच राहिली.

अवनीला मारताना नियमांचं उल्लंघन ?

दरम्यान, अवनीला मारताना नियमांचं सर्रास उल्लंघन केल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केलाय. वनमंत्र्यांनी मात्र या सर्व आरोपांवर सोईस्करपणे पडदा टाकत वनविभागाची पाठ थोपटली आहे. तर दुसरीकडे अवनीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी फटाके फोडत, मिठाई वाटत आनंद साजरा केलाय. यवतमाळमधील वाघिणीची दहशत कायमची संपली. पण तिच्यासोबत असणाऱ्या दोन बछड्यांचं काय? अवनी सोबत असणाऱ्या टी-२ वाघाचं काय, आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

जाहिरात