Pune News : पुण्यातील संचारबंदीत अंशत: बदल, जाणून घ्या

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात २२ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान रात्रीची संचारबंदी जारी करण्याचे आदेश दिले होते. आता त्यात अंशत: बदल करण्यात आले आहेत. या संचारबंदीच्या काळात ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा तसेच वस्तू यांना याबाबत सवलत देण्यात आली आहे.

सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबतचा आदेश शुक्रवारी रात्री उशिरा काढला आहे. त्यानहुसार ५ जानेवारीपर्यंत दररोज रात्री २३ ते दुसरे दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र, त्यात सर्वांना हा आदेश लागू करण्यात आला नसून ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे.

ADV

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४(१) (३) प्रमाणे २२ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत संचारास मनाई आदेशात अंशत: बदल करण्यात आला आहे. यानुसार आता जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. लोकांनी एकत्र येण्यास रात्रीच्या वेळी मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार वैयक्तिकरित्या नागरिक ये जा करु शकतात.