गुरु दादा वासवानी यांच्या अंत्ययात्रा मार्गावरील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अध्यात्मिक गुरु आणि साधु वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे.पी.वासवानी यांचे गुरुवारी (दि.१२) सकाळी पुण्यात ९९व्या वर्षी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (दि.१३) दुपारी तीन वाजता साधू वासवानी मिशन येथून निघणार आहे. अंत्ययात्रेला होणाऱ्या गर्दीमुळे या मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.

अंत्ययात्रेचा मार्ग खालील प्रमाणे

साधू वासवानी मिशन गेट – डावीकडे वळून साधू वासवानी चौक, उजवीकडे वळून कौन्सील हॉल चौक, ब्ल्यु नाईल हॉटेल चौक, दोरवजी चौक, नेहरु मेमोरीयल चौक, बॅनर्जी चौक, शांताई हॉटेल चौक, कॉटरगेट चौक, भवानीपेठ पोलीस लाईन समोरुन पदमजी चौकी, निशात टॉकीज, बाबाजान चौक, भोपळे चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, अरोरा टॉवर, दोराबजी चौक, नेहरु मेमोरियल चौक, किराड चौकातून साधू वासवानी मिशन येथे अंत्ययात्रा समाप्त होणार आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b60e307d-85e8-11e8-b30b-37fcc7b8f434′]

वाहन चालकांनी या मार्गाचा वापर न करता इतर पर्य़ायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.