पुण्यातील रेसकोर्स मार्गावरील वाहतुकीत दोन दिवसांसाठी बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जनरल परेड ग्राऊंड (रेसकोर्स) मैदानावर सोमवार (दि.७) आणि मंगळवार (दि.८) या दोन दिवशी सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी रविवार (दि.६) पासून उमेदवार मोठ्या प्रमाणात येणार असल्याने वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.

या मार्गावरील वाहतूक सुरक्षीत व सुरळीत चालण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल आज (रविवार) सायंकाळी पाच पासून करण्यात आले असून मंगळवारी (दि.८) गर्दी संपेपर्यंत हा बदल राहणार असल्याचे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले आहे.

वाहतुकीतील बदल खालील प्रमाणे…

१) इंप्रेस गार्डन जवळील कॅन्टोन्मेंट नाक्याकडून रेसकोर्स कडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद

पर्य़ायी मार्ग – लष्कर, पुणे स्टेशन परिसरात जाणाऱ्या वाहन चालकांनी मोर ओढा चौकातुन डावीकडे वळून सदन कमांड चौकातुन डाव्या बाजुने वळून एसबीआय हाऊस जवळून इच्छितस्थळी जावे.

२) आर्मी पब्लीक स्कुल चौकातुन रेसकोर्सकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद

पर्य़ायी मार्ग –   लष्कर, पुणे स्टेशन परिसरात जाणाऱ्या वाहन चालकांनी मोरओढा चौकातुन डावीकडे वळून सदन कमांड चौकातुन डाव्या बाजुने वळून एसबीआय हाऊस जवळून इच्छितस्थळी जावे.

३) पाण्याच्या टाकी कडून टर्फक्लबकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद

पर्यायी मार्ग – हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी लष्कर पोलीस स्टेशन कडून सरळ पुढे येऊन बिशप सर्कल मार्गे मम्मादेवी चौक पुढे इच्छितस्थळी.

४) अर्जुनरोड जंक्शनकडुन रेसकोर्सकडे जाणारा मार्ग वाहतुकासीठी बंद

पर्य़ायी मार्ग – लष्कर, पुणे स्टेशन परिसरात जाणाऱ्या वाहन चालकांनी मम्मादेवी चौकातुन पुढे गोळीबार मैदान चौकातुन डावीकडे वळुन खाण्यामारुती चौकातुन इच्छितस्थळी जावे.

५) गुरुद्वारा चौकातून सेसकोर्सकडे जाणारी वाहतुक बंद

पर्यायी मार्ग – या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांनी जनरल बेऊर रोड – बिशप स्कुल मार्गे मम्मादेवी चौकाकडून इच्छितस्थळी जावे.
रेसकोर्स येथे होणाऱ्या सैन्य भरतीच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेतील होणाऱ्या बदलामुळे या परिसरातील वाहतूक संथ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, वाहनचालकांनी पर्य़ायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य़ करावे असे आवाहन करण्यात आले आहे.