Tape प्रकरणात अडकलेल्या कर्नाटक मंत्र्यांचं वादग्रस्त संभाषण उघड; म्हणाले – ‘मराठी लोक चांगले पण कानडी XXX…’

बेंगळुरू :  कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या एका सेक्स सीडी प्रकरणावरून कर्नाटकातील भाजप सरकार अडचणीत सापडले होते. तसेच जारकीहोळी यांनी सेक्स टॅपमुळे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर त्यांचं आता आणखी एक वादग्रस्त चॅट उघडकीस आलं. या प्रकरणामध्ये मंत्री जारकीहोळी यांनी महिलेशी केलेलं संभाषण समोर आले आहे.

मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अधिक भ्रष्टाचार केला आहे आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असे त्यांनी या महिलेला सांगितल्याचं समोर आले आहे. तर महाराष्ट्रातील लोक चांगले आहेत आणि कर्नाटकातील कानडींना काही काम नाही असेही वक्तव्य मंत्री जारकीहोळी यांनी केल्यालं यामध्ये उघड झालं आहे.

दरम्यान, मंत्री जारकीहोळी यांनी काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे चांगले नेते होते असेही भाष्य त्यांनी केलं होत. तर या सेक्स टॅपमुळे भाजप अडचणीच्या भोवऱ्यात सापडला आहे. तसेच तेथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश कालाहळ्ळी यांनी जारकीहोळी यांच्या विरुद्ध तक्रार दिली यावरून कर्नाटक पोलिसांनी जारकीहोळी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तर दिनेश कालाहळ्ळी यांनी या महिलेला सरकारी नोकरी देण्याच्या बदल्यात जारकीहोळी यांनी तिला सेक्शूअल फेव्हर्ससाठी भाग पाडल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.

तर या प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले की, हे केवळ सेक्स स्कँडल नाही. त्या टेपमध्ये मंत्र्यांनीच मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला आहे. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. अशी जोरदार टीका त्यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर केली आहे. तसेच कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी जारकीहोळी यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी पोलीस करत आहेत असं सांगितलं आहे.