धानोरे ग्रामपंचायत प्रथम महिला उपसरपंच पदी छाया गावडे यांची निवड

धानोरे: पोलीसनामा आॅनलाइन
धानोरे ग्रामपंचायत येथे छाया गावडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्या धानोरे ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी निवडून आलेल्या पहिल्या महिला उपसरपंच आहेत.

छाया गावडे यांचे अभिनंदन करताना डिझायर जाहिरात संस्थेचे प्रोप्रायटर कुमार खालापुरे

यावेळी माजी उपसरपंच गुलाब बाळासाहेब गावडे यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच सुदरताई गावडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी छाया गावडे याची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe2d37f5-8697-11e8-94c0-c1ca3ccdaff5′]

धानोरे ग्रामपंचायत येथे सुंदरताई गावडे (सरपंच), छाया गावडे (उपसरपंच), अनिल किसन गावडे (सदस्य), गुलाब बाळासाहेब गावडे (सदस्य), अर्चना संदीप गावडे (सदस्य), वैशाली ज्ञानेश्वर गावडे(सदस्य), नंदकुमार नारायण गावडे (सदस्य), जनाबाई संतोष गावडे (सदस्य), अनिता वेदानंद गावडे(सदस्य) पदी कार्यरत आहेत.