खुशखबर ! ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चं ग्राहकांना मोठं गिफ्ट, सणासुदीचा विचार करून ‘नवे’ दर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता बँक आपल्या व्याजदरात कपात करणार आहे. यामुळे ग्राहकांना कमी EMI भरावा लागेल. बँक ऑफ महाराष्ट्रकडून सांगण्यात आले की सणसुदींचा विचार करता नवे दर 1 सप्टेंबरपासून लागू होतील.

देशाला मंदीची चाहूल लागली आहे. त्यामुळे सरकारकडून अनेक आर्थिक निर्णय घेण्यात येत आहे. तसेच RBI देखील रेपो दर कपात करत आहे. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली की, बँका RBI च्या रेपोदराप्रमाणे व्याज दर ठेवण्यास तयार आहेत. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रने देखील आपले व्याजदर आरबीआयच्या रेपो दराशी जोडले.

बँक ऑफ महाराष्ट्रने आपले व्याजदर RBI च्या रेपो दराशी जोडले आहेत. त्यामुळे RBI चे रेपो दर कमी झाल्यास बँक आपले व्याजदर कमी करेल तर RBI चे रेपो दर वाढल्यास बँक आपले व्याज दर वाढवेल. परंतू RBI ने नुकतेच आपला रेपो दर कमी केल्याने त्या रेपो दराशी जोडलेल्या बँकांनी आपले व्याज दर कमी केले आहे.

– बँकने सांगितले की, गृह कर्जाचे व्याजदर पहिल्यांदाच रेपो दराशी जोडले आहेत.
– बँकने रिटेल कर्जाला आता रेपो दराशी जोडल्याने बँकेचे व्याजदर देखील कमी होतील. त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल.
– यापुढे रेपो दरात जेव्हा जेव्हा बदल होतील तेव्हा तेव्हा बँकेच्या व्याज दरात देखील बदल होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या