BSNL नं Airtel-Vodafone ला टाकलं मागे, स्वस्तातील प्लॅनमध्ये मारली बाजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सर्वात स्वस्त मिळणाऱ्या प्लॅनमध्ये BSNL ने एअरटेल आणि व्होडाफोनला मागे टाकले आहे. बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये ग्राहकांना एअरटेल आणि व्होडाफोन पेक्षा अधिक फायदा मिळत आहे. BSNLचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 18 रुपयांचा आहे. तर व्हॅलिडिटीबरोबर येणाऱ्या एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचा सर्वात स्वस्त प्लॅन 19 रुपयांचा आहे. BSNL ने आपल्या 18 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले असून यामध्ये मिळणारे सर्व बेनिफिट्स वाढवले आहेत.

BSNL च्या 18 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे

बीएसएनएलचा 18 रुपयांचा प्लॅन स्पेशल टेरिफ व्हाऊचर (STV) सर्व सर्कलसाठी असणार आहे. प्लॅनमध्ये करण्यात आलेले बदल 5 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार आहेत. नव्या बदलानुसार या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्सची ऑफर मिळत आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर ट्रूली अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह व्हिडीओ कॉल्सचा फायदा मिळत आहे. तसेच 1GB डेटा मिळणार आहे. त्यासोबत 100 एसएमएस पाठण्याची मुभा दिली जाणार असून या प्लॅनची वैधता दोन दिवसांची आहे.

एअरटेलचा 19 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 19 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दोन दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. मात्र, BSNL च्या 18 रुपयांच्या प्लॅनसोबत केवळ 200 एमबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही.

व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये कमी डेटा

व्होडाफोनचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 19 रुपयांचा आहे. व्होडाफोन-आयडियाच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. पण BSNL च्या 18 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत यामध्ये केवळ 200 एमबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही.