Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | तुमचे पार्सल बाहेरच्या देशात जात असून त्यामध्ये ड्रग्ज सापडल्याचा बहाणा करुन नागरिकांना कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशाच एका पार्सल फ्रॉडच्या घटनेत तरुणीला चक्क ऑन कॅमेरा तपासणी करायचे असल्याचे सांगून तिला अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आयटी अभियंता असलेल्या 28 वर्षीय (Engineer IT Girl) तरुणीने विमानतळ पोलिसांकडे (Viman Nagar Police) तक्रार दिली आहे.(Cheating Fraud Case Pune)

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय तरुणी लोहगाव परिसरात राहते. 3 नोव्हेंबर 2023 रोजी तिला मोबाईलवर फोन आला. समोरच्या व्यक्तीने फेडोक्स कंपनी मुंबई आणि नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे अधिकारी असल्याचे भासवले. तुमच्या नावाने मुंबई ते तैवान असे एक पार्सल जात आहे. यामध्ये पाच पासपोर्ट, आयसीआय बँकेचे सहा क्रेडीट कार्ड, लॅपटॉप आणि 950 ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. हे पार्सल मुंबई विमानतळ येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी पकडले आहे असे सांगितले.

तसेच तुमच्या बँक अकाउंटबाबत दहशतवाद्याशी संबंधित आहे, अशी भीती घातली.
त्यानंतर तरुणीच्या बँक खात्यातून 13 लाख 94 हजार रुपये परस्पर वर्ग करुन घेतले.
तसेच आमच्या लेडी ऑफिसर असून आपल्या शरीरावर कुठे तीळ आहे हे स्काईप आयडीवरुन दाखविण्यास भाग पाडले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार (PI Sarjerao Kumbhar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट