आपला मोबाइल स्लो आहे ? ‘या’ अँपद्वारे चेक करा इंटरनेटचा स्पीड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलीकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरनेटचा स्पीड टेस्ट करण्यासाठी एक नवे ॲप लाँच केले आहे. त्याचे My Speed असे नामकरण करण्यात आले आहे. आता या ॲपचा उपयोग करून युझर्स आपला डेटा स्पीड करू शकतील.

ॲप देणार ‘ही’ माहिती –

आपल्या स्मार्टफोनवर इंटरनेटचा स्पीड चेक करण्यासाठी युझर्स अनेकदा स्पीड टेस्ट ॲप्सचा उपयोग करतात. ट्रायच्या या ॲपच्या माध्यमातून आपल्याला फक्त डेटा स्पीडच नाही तर कव्हरेज, नेटवर्क इंफॉर्मेशन आणि डिव्हाइस लोकशनही चेक करता येणार आहे. ट्रायच्या मते, हे ॲप कोणत्याही प्रकारे युजर्सची माहिती संकलित करत नाही. स्पीड टेस्ट नंतर आपल्या टेलीकॉम सेवा पुरवठादार कंपनीकडे याची तक्रारही नोंदवू शकतो.

असे करा ॲप डाउनलोड

ट्रायच्याॲपद्वारे डेटा स्पीड चेक करण्यासाठी सर्वप्रथम ॲप स्टोरमधून माय स्पीड ॲप डाउनलोड करावे लागेल. आयओएस युजर्स ॲपलॲप स्टोरमध्ये जाऊन माय स्पीडॲप सर्च करा. त्यानंतर ‘गेट’ बटनावर क्लिक करून ॲप इनस्टॉल करा. अँड्रॉइड युजर्स गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन माय स्पीड ॲप सर्च करा आणि इनस्टॉल पर्याय निवडून ॲप डाउनलोड करा.

ॲपचा असा करा उपयोग –

१ माय स्पीडॲप डाउनलोड केल्यानंतर ते आपल्या स्मार्टफोनमध्ये ओपन करा.
२ ॲपला आवश्यक असलेल्या परवानग्या जसे लोकेशन, मॅनेज फोन कॉल्सला परवानगी द्या.
३ इंटरनेट स्पीड चेक करण्यासाठी खालच्या बाजूस डावीकडे असलेले बटन क्लिक करा.
४ यानंतर ‘Begin Test’ बटनावर क्लिक करून स्पीड टेस्टची प्रक्रिया सुरू करा.
५ प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबा
६ रिझल्ट सेक्शनमध्ये जाण्यासाठी आपल्यालाॲपमध्ये ३ हॉरिझॉन्टल बार्स दिसतील त्यावर क्लिक करा.
७ यानंतर आपल्याला स्पीड टेस्टचा रिझल्ट पाहायला मिळेल
८ रिझल्टवर क्लिक करून आपण स्पीड टेस्टची सविस्तर माहिती घेऊ शकता.