सावधान ! ऑफिसमध्ये ‘दारु’ पिऊन जाणं महागात पडणार, सॉफ्टेवअर पाठवणार HR ला ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दारु पिऊन आता ऑफिसमध्ये एन्ट्री करण्याचा विचार ही करु नका, कारण दारु पिऊन ऑफिसमध्ये गेल्यास तुम्हाला ते महागात पडेल. चेन्नईच्या रॅमको कंपनीने फेशिअल अटेंडंस सिस्टिम तयार केली आहे जी श्वासनाची गती तपासून तुम्ही नशेत आहेत का किंवा तुम्ही अंमली पदार्थ्यांचे सेवन केले आहे का हे ओळखणार आहे. या प्रणालीत ब्रीथ अ‍ॅनालायजरचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याचे आणि श्वासनाचे विश्लेषण करण्यात येईल. या विश्लेषणात कर्मचारी नशेत आढळल्यास याचा अलर्ट लगेचच कंपनीच्या एचआरला पाठवण्यात येईल.

ही प्रणाली बनवणाऱ्या कंपनीने दावा केला आहे की ब्रीथ अ‍ॅनालायजर १०० टक्के सत्य अंदाज बांधते असे सांगितले आहे. यामुळे नशा करुन ऑफिसल्या येणाऱ्याची ओळख पटेलं. या कर्मचाऱ्यांना येण्यास बंदी घातल्याने कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहिलं.

कंपनीचे सीईओ विरेंद्र अग्रवाल यांच्या मते, हे असे सॉफ्टवेअर आहे जे नशा करणाऱ्यांसह ड्रग सेवन करणाऱ्यांना देखील पकडू शकेल.

एक रिसर्च मध्ये समोर आले की, भारतात २०१० ते २०१७ दरम्यान अल्कोहोल घेणाऱ्यांची संख्या तब्बल ३८ टक्क्यांवर पोहचली आहे. याचा परिणाम ऑफिसमध्ये काम करणाऱ्यावर आणि तेथील वातावरणावर पडतो. कंपनीचे म्हणणे आहे की वेळच्या वेळी माहिती देऊन ते सॉफ्टवेअर मद्यसेवनामुळे होणारी दुर्घटना रोखेल.

आरटीआयच्या माहितीनुसार, २०१५ मध्ये १७१ वैमानिकांना विमान उडवण्याआधी नशा केली होती. जून महिन्यात दिल्लीच्या जल निगमच्या कर्मचाऱ्यांचा अल्कोहोल सेवन करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, या कर्मचाऱ्यांना नंतर सस्पेंड करण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like