Chhagan Bhujbal | ‘पुण्यात हे काय चाललंय? पोलीस आयुक्तांनी…’, पुण्यातील घटनेवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले ‘आरोपीला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सदाशिव पेठेत एका महाविद्यालयीन तरूणीवर तिच्या मित्रानं कोयत्याने हल्ला (Assault On Girl In Sadashiv Peth Pune) करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सदाशिव पेठेतील गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्तांनी (Pune Police CP) या प्रकरणात कडक कारवाई करावी अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.

मंगळवारी (दि.28) पुण्यामध्ये एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून तरुणानं कोयत्यानं वार केला. यावर बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, हे काय चाललंय? महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी काम केलं. अशा या पुण्यभूमीत काय चालू आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात कडक कारवाई करावी, अशा आरोपींना मोक्का (MCOCA Action) Mokka लावला पाहिजे अशी मागणी भुजबळ यांनी केली.

रामदास आठवलेंचे मानले आभार

आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले (RPI Chief Ramdas Athawale) यांनी छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. यावर बोलताना त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. आठवले यांनी मला निमंत्रण दिलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी त्यांना लवकरच भेटणार आहे. मला रिपाईमध्ये कोणतं पद भेटणार यावर मी त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे भूजबळ म्हणाले.

मी राष्ट्रीय कार्यकारिणीवर नाही

छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर देखील प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. मात्र या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा होईल की नाही मला माहित नाही. मला त्याची काहीही कल्पना नाही. मी राष्ट्रीय कार्यकारिणीवर नाही. मला त्या कार्यकारिणी बैठकीचे आमंत्रणही नाही. पाटण्यात सर्व विरोधकांची जी बैठक झाली त्यावर त्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, असंही भूजबळ यांनी सांगितले.

Web Title :   Chhagan Bhujbal | Chhagan Bhujbal while reacting to the incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Maharashtra Cabinet Decision | वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला सावरकरांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Actress Sonnalli Seygall | अभिनेत्री सोनाली सेहगल मालदीवमध्ये एन्जॉय करतीये हनीमून; फोटो केले पोस्ट