छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ५ जवान गंभीर जखमी

बीजापूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये सुरु असलेल्या नक्षली कार्यवाहीत पाच जवान जखमी झाले आहेत. नक्षलवादी गटाकडून घडवलेल्या स्फोटाने या चकमकीला तोंड फोडले आहे. या स्फोटात एका ग्रामस्थाला हि इजा पोचली असून स्फोट घडल्या नंतर नक्षलवादि आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये जोरदार चकमक घडून आली आहे.

बीजापूर घाटी क्षेत्रात नक्षलवाद्यांनी बुधवारी सकाळी अत्याधुनिक स्फोटकांच्या सहाय्याने (आईडी) स्फोट घडवून आणला आहे. या बॉम्ब हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून त्यांच्या सोबत एक गावकरी हि या हल्ल्यात जखमी झाले आहेत. बॉम्ब स्फोटानंतर झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले असून एकूण जखमी जवानांची संख्या पाच इतकी आहे. जखमींना बीजापूरमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नक्षलवादी आणि सीमा सुरक्षा जवान यांच्यात सुरु असलेली चकमक सध्या थांबली असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे असे. सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

या महिलेने ४३ व्या वर्षी दिला २१ व्या बाळाला जन्म, म्हणाली अाता बस्स… 

छत्तीसगड येथे विधानसभेची निवडणूक सूरु आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये सोमवारी मतदान पार पडले आहे. मतदानाच्यावेळी देखील नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. तसेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी सकाळी देखील नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी जखमी झाले होते. आजचा हल्ला हि सकाळीच घडवला आहे. त्यामुळे  यापुढे सकाळच्या वेळी दक्ष राहण्याच्या सूचना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिल्या आहेत. रात्रभर गस्त घातल्या नंतर गस्ती पथक सकाळच्या वेळी सुरक्षा थोडी शिथिल करतात आणि त्याच काळात नक्षलवादी बेसावध जवानांवर हल्ला चढवतात असे त्या भागात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांकडून सांगण्यात आले आहे. छत्तीसगड मधील निवडणूक कार्यक्रम संपेपर्यंत नक्षलवादी कार्यवाही थांबणार नाहीत असा प्रथमिक अंदाज लष्कराने व्यक्त केला आहे . नक्षलवादी सध्या सक्रिय असलेल्या भागात लष्करी कुमत वाढवली जाण्याची संभावना आहे. छत्तीसगड मधील सुकमा दंडेवाडा विजापूर या जिल्ह्याच्या डोंगराळ वृक्ष आच्छादित भागात नक्षलवादी लपून हल्ला करतात. या तीन जिल्ह्याच्या जंगलाच्या मध्यभागी नक्षली तळ ठोकून राहतात. एकंदरच नक्षलवादाची झळ सुरक्षा व्यवस्थेला कायमच लागत आहे. हे या घटनांवरून दिसून येते.