इस्त्रोचे प्रमुख सिवन झाले भावुक

श्रीहरिकोटा : वृत्त संस्था – विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने चांद्रयान मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे इस्त्रोचे प्रमुख डॉ़ के. सिवन भावुक झाल्याचे पाहिल्या मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवकाश सेंटरमधून बाहेर जात असताना त्यांना सोडण्यासाठी डॉ. सिवन हे बाहेर आले. त्यावेळी सिवन यांच्या डोळ्यात अश्रु दाटून आले. तेव्हा मोदी यांनी त्यांची गळाभेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी डोळ्यावरील चष्मा काढत आपले अश्रु पुसले. यावेळी मोदी यांनी त्यांना काही सांगितले. तेव्हा त्यांनी त्याला प्रतिसाद देत आपले अश्रु आवरले. त्यानंतर हस्तांदोलन करीत मोदी हे तेथून बाहेर पडले.

हा प्रसंग वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारित करण्यात आला. डॉ. सिवन यांना भावूक झाल्याचे पाहून संपूर्ण देशभरातील लोकांना गहिवरुन आले.

विज्ञानात अपयश नसतेच असतो तो केवळ प्रयोगच. या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले आर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्वाच्या अवकाश शक्तीपैकी एक आहे. तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक इथे असल्याने याचा मोठा फायदा होतो, असे सांगत त्यांनी इस्त्रोमधील उपस्थित प्रत्येक शास्त्रज्ञांची भेट घेत हस्तांदोलन केले.

You might also like