चिमुकल्यांनी पोलीस काकांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण 

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

विविध लोकाभिमुख उपक्रमाबाबत जागरुक असलेल्या वारजे पोलीस ठाण्यात आज राखीपोर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. मातोश्री नॅशनल स्कुलच्या २५ व ३० बालकांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व समिती सदस्य यांना राख्या बांधुन औक्षण केले.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0443995b-a84c-11e8-8f3f-81cab671a70e’]

शिक्षिका सौ. निता धावडे, प्रिती खरपे व कर्मचारी सौ सविता पवार यांनी विशेष पुढाकार घेतला. PSI श्री. अमोल कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करुन उपक्रमाचे कौतुक केले तर ॲड. राहुल म्हा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजा बाबत माहीती दिली.
 

या प्रसंगी श्री. वामन काळे, मनोहर भोईणे, हरिशचंद्र केंजळे, संतोष भापकर, संग्राम केंन्द्रे, अजय डवरी व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

Loading...
You might also like