चीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा 10 हजार लोकांना दिला डोस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगाला कोरोना व्हायरस देणार्‍या चीनमधून आता नवीन बातमी समोर आली आहे. आता चीनने आपल्या येथे हजारो लोकांना ट्रायल न घेताच कोरोना वॅक्सीनचे डोस दिले आहेत. वॅक्सीन देण्यासाठी वेगवेगळ्या वर्गातील लोकांची निवड केली आहे. यामध्ये शिक्षक, सुपर मार्केट कर्मचारी आणि अन्य जोखमीचे काम करणार्‍यांचा समावेश आहे. ही वॅक्सीन सर्वप्रथम राज्याच्या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या मजूरांना देण्यात आली, त्यानंतर सरकारी अधिकारी आणि नंतर वॅक्सीन बनवणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांना देण्यात आली.

सुरू आहे कोरोना व्हायरस वॅक्सीनचा शोध
जगभरातील देश एका ठोस कोरोना वॅक्सीनचा शोध घेण्यात व्यस्त असताना तिकडे चीनने वॅक्सीनची पारंपारिक चाचणी पूर्ण न करताच हजारो लोकांना तिचा डोस दिला आहे. आता ही वॅक्सीन आणखी लोकांना देण्याची योजना आहे. ज्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. चीन एक मोठा डाव खेळत आहे, कारण एकावेळी वॅक्सीनचे इतक्या लोकांवर परिक्षण हेसुद्धा सिद्ध करेल की, त्यांची वॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित काम करत आहे किंवा नाही. याचे परिणाम समोर येतील.

जगभरातील देश हैराण
अगोदर चीनने संपूर्ण जगाला कोरोना व्हायरस दिला, आता तो इतक्या मोठ्याप्रमाणात वॅक्सीनचे डोस लोकांना देत आहे की, जगभरातील शास्त्रज्ञ हैराण आहेत. चीनने कोणत्याही नियमांचे पालन न करता एकावेळी 10 हजारपेक्षा जास्त लोकांवर वॅक्सीनची चाचणी केली आहे.

बेकादेशीर करारावर सही
चीनी वॅक्सीन निर्माते आणि राज्याची मालकी असलेल्या कंपन्यांच्या कर्मचार्‍यांसाठी लस घेण्यासाठी दबाव आहे. कंपन्यांनी वॅक्सीन घेणार्‍या लोकांना एक बेकायदेशीर करारावर हस्ताक्षर करण्यास सांगितले, जेणेकरून त्यांनी मीडियासमोर या गोष्टी मांडू नयेत.

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये मर्डोक चिल्ड्रन रिसर्च इन्स्टीट्यूटचे बाल रोग तज्ज्ञ डॉ. किम मुलहोलैंड यांचे म्हणणे आहे की, कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी ही चिंता आहे की, नकार देणे अवघड ठरू शकते. नाईलाजाने त्यांनी वॅक्सीन घेतलेली असू शकते. अजूनपर्यंत चीन एक वॅक्सीन विकसित करण्यासाठी संयुक्त राज्य अमेरिका आणि अन्य देशांमध्ये धावपळ करत होता. त्याचे प्रतिस्पर्धी देश जास्त सतर्कतेने वॅक्सीनसाठी पुढे जात होते.

एजन्सीनुसार, हे स्पष्ट झालेले नाही की, चीनमध्ये किती लोकांना कोरोना व्हायरसची लस देण्यात आलेली आहे. चीनची सरकारी मालकी असलेली कंपनी सिनोफार्माचे म्हणणे आहे की, हजारो लोकांनी वॅक्सीनचा डोस घेतला आहे. बिजिंगयेथील कंपनी सिनोवॅकने म्हटले की, बिजिंगमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांना या वॅक्सीनचे इंजेकशन देण्यात आले आहे.

यापूर्वी चीनी सेंटर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या मुख्य जैव सुरक्षा तज्ज्ञाने खुलासा केला कीख आम्ही एप्रिलमध्ये सुद्धा इंजेक्शन दिले होते, तर काही लोकांना येथे वॅक्सीन नोव्हेंबरमध्ये दिली जाईल. तज्ज्ञांचे म्हटले की, आतापर्यंत ज्या लोकांना वॅक्सीन देण्यात आली, त्यापैकी कुणीही आजारी पडलेले नाही.