आणखी एक चीनी धोका : मनुष्यात आढळला H10 N3 बर्ड फ्लूचा संसर्ग, संपूर्ण जगातील पहिले प्रकरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी माहिती दिली की देशाच्या जिआंगसू राज्यात H 10 N3 बर्ड फ्लू ची पहिली मानवी आवृत्ती समोर आली आहे. याचा अर्थ हा आहे की, H 10 N3 बर्ड फ्लूचा संसर्ग पहिल्यांदा एखाद्या मनुष्यात आढळला आहे. हा संसर्ग एका पुरुषात आढळला आहे.

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

जिआंगसू राज्यातील झेनजियांग शहरात एका 41 वर्षांच्या पुरुषात हा बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. असे समजले जात आहे की, पोल्ट्री फार्ममधून हा बर्ड फ्लू पसरला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा पसरण्याचा धोका खुप कमी आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर लिहिण्यात आलेल्या एका वक्तव्याच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले की, जगात आतापर्यंत H 10 N3 बर्ड फ्लूच्या मानवी संसर्गाचे कोणतेही प्रकरण नोंदले गेलेले नाही.

Hair Care : आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या

आयोगाने माहिती दिली की, 28 एप्रिलला व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. व्यक्तीला ताप आणि इतर लक्षणे होती. एक महिन्यानंतर म्हणजे 28 मे रोजी व्यक्तीमध्ये H 10 N3 बर्ड फ्लूच्या व्हायरसचे निदान झाले. मात्र, आयोगाचे म्हणणे आहे की, या व्हायरसचा धोका सध्या इतका नाही.

READ ALSO THIS :

 

भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’

जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्‍यावर येईल Instant Glow

संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या

धक्कादायक ! बीलावरुन ‘कोरोना’मुक्त महिलेला पती आणि मुलीकडून मारहाण, चाकूनं केला हल्ला, FIR दाखल