Corona Virus : जगाला वाचविण्यासाठी आपल्या 6 कोटी लोकांची ‘कुर्बानी’ देणार चीन ! हुबईला ‘या’ किंमतीवर सोडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संगीतकार झांग यारु यांच्या आजीचे सोमवारी निधन झाले. त्यांना सतत रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. जॉन चेन, एक पदवीधर विद्यार्थी आहे. ज्याने त्याच्या आईसाठी मदत मागितली होती कारण त्याच्या आईला अत्यंत ताप आला होता आणि त्यांची प्रकृती अशी नाही की त्या कोरोना व्हायरससाठी शहरात तपासाणीसाठी रांगेत उभ्या राहू शकतील.

लोकांच्या चेहऱ्यावर भीती –

एका वृत्तानुसार मन पिळवटून टाकणारे हे दृश्य चीनच्या हुबई प्रांतातील आहेत, ज्यांना चीन सरकारने आहे त्याच्या आशेवर सोडून दिले आहे. चीनच्या हुबई प्रांतात अराजकता निर्माण झाली आहे आणि रोज लोकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे. 60 मिलियन म्हणजे 6 कोटी लोकसंख्या असलेल्या या प्रांतात कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली आहे आणि पहिल्यांदा डिसेंबर 2019 मध्ये येथून पहिला रुग्ण आढळला होता. कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या 97 टक्के लोकांची संख्या येथीलच आहे.

हुबेईमध्ये कोरोनाचे 97 टक्के रुग्ण –

जगभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने हुबेईमध्ये दहशत निर्माण केली आहे. येथे कोरोना व्हायरसचे 97 टक्के लोक आहेत. हुबईच्या राजधानी वुहानमध्ये आकडा वाढत आहे. या व्हायरसचा इलाज अशक्य आहे. चीन सरकारने 23 जानेवारीपासून हा प्रांत आपल्यापासून पूर्णता वेगळा केला आहे.

23 जानेवारीपासून प्रतिबंध –

हुबेईमध्ये वाढणारे प्रकार पाहता चीन सरकारने 23 जानेवारीपासून या प्रांतातून बाहेर जाण्यास प्रतिबंध लावले आहेत जेणे करुन जगभरात हा व्हायरस पसरणार नाही. परंतु हुबेई एक औद्योगिक हब आणि जेथे कारच्या देखील फॅक्टरी आहेत.

चीनच्या रोग नियंत्रण केंद्राने पूर्व उपमहानिदेशक यांग गोंगहुआन यांनी सांगितले की जर प्रांत सील करण्यात आला नसता तर लोक संपूर्ण देशभरात वैद्यकीय मदत घेण्यासाठी गेले असते आणि संपूर्ण देशात हा प्राणघातक व्हायरस पसरला असता. व्हायरस इतका वेगाने पसरला आहे, की सरकारला देखील लक्षात आले नाही.