चीन ‘कोरोना’ वॅक्सीन बनविण्यात यशस्वी, मनुष्यावरील ‘ट्रायल’चे आले खूप पॉझिटिव्ह ‘रिझल्ट’ !

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी जगातील तमाम देश संघर्ष करत आहेत. जगभरात या आजाराचा सुमारे 54 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. तर जगभरात विविध देशात 8 वॅक्सीनची क्लिनिकल ट्रायल केली जात आहे. तसेच अन्य 110 वॅक्सीन संपूर्ण जगात विकासाच्या विविध टप्प्यातून जात आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. आता चीनने दावा केला आहे की, त्यांनी एक वॅक्सीन तयार केली आहे, जी अधिक सुरक्षित आहे आणि कोरोनापासून मनुष्याला वाचवू शकते.

अमेरिकन औषध कंपनी मोडर्नाने सुद्धा कोविड-19 वॅक्सीनच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी ट्रायलची घोषणा केली आहे. यानंतर मागील शुक्रवारी संशोधकांनी म्हटले की, चीनमध्ये विकसित एक वॅक्सीन अधिक सुरक्षित वाटत असून लोकांना कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचवू शकते.

क्लिनिकल ट्रायलपूर्वी पहिल्या टप्पयापर्यंत पोहचणार्‍या कोविड-19 चा पहिला डोस माणसासाठी सुरक्षित आणि प्रतिबंध प्रतिक्रिया उत्पन्न करण्यात सक्षम आहे. द लान्सेट पत्रिकेत या नव्या संशोधनाचा खुलासा केला आहे. या वॅक्सीनचा 108 लोकांवर अभ्यास करण्यात आला, ज्यांचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान होते. त्यांना या लसीचा एक डोस देण्यात आला, ज्यामुळे सार्स-सीओव्ही-2 ला संपुष्टात आणणार्‍या अँटीबॉडी निर्माण केल्या गेल्या आणि रोग प्रतिबंधक तंत्राच्या टी-पेशींच्या मदतीने प्रतिक्रिया निर्माण केली. दोन आठवड्यात या टी पेशी बनवल्या.

चीनच्या बिजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांसह इतर तज्ज्ञांनी म्हटले की, सार्स-सीओव्ही-2 संसर्गाविरोधात ही लस संरक्षण देते किंवा नाही याबाबत आणखी संशोधन करण्याची गरज आहे. अभ्यासात म्हटले आहे की, 108 निरोगी ज्येष्ठांवर केलेल्या परिक्षणात, लसीने 28 दिवसानंतर चांगले परिणाम दाखवले. आता शेवटच्या परिणामांचे परिक्षण पुढील सहा महिन्यात करण्यात येईल. याबाबत अभ्यासाचे सह-लेखक बिजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजीचे वेयी चेन यांनी म्हटले, हे  परिणाम मोठे यश दाखवत आहेत, मनुष्यावर केलेली ट्रायल सांगत आहे की, एडेनोव्हायरस टाईप 5 वेक्टर्ड कोविड-19 (एडी5-एनसीओव्ही) च्या एका डोसमुळे 14 दिवसात व्हायरसविरूद्ध अँटीबॉडी आणि टी पेशी निर्माण होतात.

संशोधकांनी सांगितले की, परिक्षणामध्ये वापरलेली एडी5 वेक्टर्ड कोविड-19 लस मनुष्यावर परिक्षण केलेली ही पाहिली टेस्ट आहे. या लसीत ताप निर्माण करण्यात कमजोर पडलेल्या एडेनोव्हायरसचा वापर करण्यात आला, जो पेशींमध्ये सार्स-सीओव्ही-2 स्पाईक प्रोटीनसाठी कोडिंगचे काम करणारी आनुवंशिक सामग्री तयार करतो आणि या पेशी पुन्हा स्पाईक प्रोटीन निर्माण करतात. हे पुन्हा स्पाईक प्रोटीनची ओळख देतात आणि कोरोना व्हायरसशी लढतात.