Coronavirus : 4 आठवडयात कमी होणार ‘कोरोना’ व्हायरसची प्रकरणं, चीनच्या शास्त्रज्ञाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या चार आठवड्यात चीनमध्ये कोरोना विषाणू पसरणार नाही त्याचबरोबर कोरोना विषाणूची प्रकरणे कमी होऊन संपुर्ण जग बदलून जाईल, असा दावा चीनच्या सर्वात मोठ्या कोरोना विषाणू तज्ञ झोंग नानशान यांनी केला आहे. झॉन्ग हे कोरोना व्हायरससाठी चीन सरकारनं तैनात केलेल्या मुख्य टीमचे प्रमुख आहेत.

83 वर्षाचे डॉ. झोंग यांनी शेन्झेन टेलिव्हिजन स्टेशनवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चीनमध्ये कोरोना विषाणूचा दुसरा हल्ला होणार नाही कारण आम्ही देखरेखीची यंत्रणा बरीच मजबूत केली आहे. कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. पहिले म्हणजे आपण संसर्गाच्या स्तराला सर्वात खालच्या पातळीवर घेऊन गेले पाहिजे. नाहीतर त्याचा प्रसार थांबवला पाहिजे. यामुळे आपल्याला लस तयार करण्यास वेळ मिळेल आणि आपण हा रोग दूर करण्यास सक्षम होऊ.

डॉ झोंग नानशेन म्हणाले की, दुसरा मार्ग कोरोनाच्या संक्रमणातील गॅप वाढवावा आणि आपल्या काही रुग्णांची संख्या वेगवेगळ्या पद्धतीनं कमी करावे. बहुतांश देशांनी कोरोनासंदर्भात कठोर उपाय केले आहेत. अशा परिस्थितीत, मी आशा करतो की येत्या चार आठवड्यात नवीन प्रकरणे जवळजवळ थांबतील.

डॉ झोंग यांनी सांगितले की, जगात ही गोष्ट पसरली जात आहे की, चीनमध्ये अजूनही लाखो सायलेंट कोरोना कॅरिअर्स आहेत. हे खोटे आहे आमचे सर्व रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत ज्यांना कोरोना संसर्ग आहे परंतु लक्षणे दिसत नाहीत. त्यांना एसीम्प्टोमॅटिक केस म्हणतात.

डॉ झोंग म्हणाले की, जर अशाप्रकारचे एखादे प्रकरण समोर आले तरी त्यांच्याकडून संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी असतो. कारण त्यांच्या शरीरात आधीपासूनच अॅंटीबॉडिज असतात जे विषाणूंविरूद्ध लढत असतात.