Coronavirus Lockdown In China : ‘लॉकडाऊन’ शिथिल केल्यानंतर चीनमध्ये उफळली हिंसा, हुबेईतून बाहेर पडण्यासाठी ‘धडपड’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरण आता कमी होत असताना हिंसेच्या घटना वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने दोन महिन्यानंतर लॉकडाऊन शिथिल केला आहे. ज्यानंतर आता लोक कोरोनाचे केंद्र असलेल्या हुबेई प्रांतातून बाहेर पडत आहेत. बस, रेल्वेमध्ये लोकांची गर्दी होऊ लागल्याने गोंधळ उडाला आहे.

एका वृत्तानुसार सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार शुक्रवारी हुबेईच्या शेजारील प्रांत असलेल्या जियांगशी जोडलेल्या पुलावर हिंसा झाली होती. व्हिडिओमध्ये दिसत आहे की घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांची गाडी देखील जमावाकडून उलटी करण्यात आली.

वृत्तानुसार, ही हिंसा तेव्हा पसरली जेव्हा अधिकाऱ्यांनी पोलिसांना ब्रिजवर (पुल) तैनात केले आणि लोकांची हुबेईहून जियांगशी प्रांत एंट्री करणं बंद केले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने एका मुलाखतीत सांगितले की ही हिंसा संध्याकाळी 6 वाजेदरम्यान घडली.

त्या व्यक्तीने सांगितले की सर्व काही पुलाच्या मध्यभागी झाले, जेथे लोकांना रस्ता बंद करुन लोकांना अडवण्यात येत होते. शुक्रवारी संध्याकाळी डिजिटल मॅपिंग अ‍ॅप्समध्ये दाखवण्यात आले की ब्रिज दुरुस्तीच्या कामासाठी दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे.

सरकारच्या अधिकृत पॉलिसीनुसार जे लोक वुहानच्या बाहेर राहतात आणि निरोगी आहेत, ती बुधवारी पासून कुठेही जाऊ शकतात. रेल्वे पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. दूर अंतरावरचा बस सुरु झाल्या आहेत आणि शुक्रवारी सर्व महामार्ग खुले केले गेले आहेत. मागील आठवड्यात हुबेईमध्ये फक्त एक कोरोनाचे प्रकरण समोर आलं. हुबेईमध्ये आतापर्यंत जवळपास 68000 प्रकरण समोर आली आहेत. ज्यात 3174 लोकांचा मृत्यू झाला आहे.