Chinchwad Bypoll Election | चिंचवडचा पुढील आमदार कोण? लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं मोठे वक्तव्य

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chinchwad Bypoll Election | कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Kasba BJP MLA Mukta Tilak) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad BJP MLA Laxman Jagtap) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका (Chinchwad Bypoll Election) जाहिर झाल्या आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) किंवा त्यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी शंकर जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे (NCP) असल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे ही जागा जिंकण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) संपूर्ण ताकदीने भाजपविरोधात ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे भाजप चिंचवडमध्ये कोणाला उमेदवारी देतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शंकर जगताप म्हणाले, जगताप कुटुंबीय हे पक्षाशी एकनिष्ठ आहे.
काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण भाऊंनी देखील पक्षाशी एकनिष्ठता दाखवली होती.
आमच्या परिवारातील सदस्य हे दु:खातून अद्याप सावलेले नाहीत.
त्यामुळे आमच्या घरात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.
मात्र, जगताप कुटुंबीय हे भाजप सोबत एकनिष्ठ असून पक्ष उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू,
असे मत शंकर जगताप यांनी व्यक्त केले. असे असलं तरी उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, बुधवारी (दि.25) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक (BJP Core Committee) झाली.
या बैठकीसाठी जगताप कुटुंबातील लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप
यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी शंकर जगताप यांना उमेदवारीची आशा आहे का?
असे विचारले असता, त्यासाठीच तर इथे आलोय, असं शंकर जगताप यांनी सांगितले.

Web Title :-  Chinchwad Bypoll Election | rupali patil on kasba peth chinchwad byelection