या संशोधनमुळे चंद्राच्या अंधाऱ्या भागाची माहिती येणार प्रकाशात

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनचे चांग ई -४ हे अंतराळ यान चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागात यशस्वीपणे उतरले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी चांग ई ४ या यानाने चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्यात यश मिळवले,असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितले. चीनच्या या मोहिमेमुळे चंद्राच्या अंधाऱ्या भागाची माहिती प्रकाशात येणार आहे. यामुळे अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात चीनने मोठे यश मिळवले आहे.

यापूर्वी अमेरिका आणि सोवियत रशिअन संघाने चंद्रावर यान उतरवले होते. मात्र, चांग-४ हे यान चंद्राच्या खालच्या भागावर उतरवण्यात आले आहे. जो भाग पृथ्वीपासून कायमच दूर अंतरावर असतो. चिनच्या अंतराळ कार्यक्रमावर सूक्ष्मपणे काम करणाऱ्या मकाऊ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर झू मेंघूआ यांनी सांगितले की, चिनचे हे अंतराळ अभियान हे दाखवते की, चीन अंतराळ संशोधनात खोलवर संशोधन करण्यामध्ये विश्वात वरच्या पातळीवर पोहोचला आहे. आम्ही चिनी लोकांनी असं काही करुन दाखवलं आहे ज्याची हिम्मत अमेरिकन लोकांनीही केलेली नाही.

चांग ई ४ हे यान आपल्यासोबत एक रोव्हर घेऊन गेले आहे. हे रोव्हर लो फ्रिक्वेंसी रेडिओ एस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेशनच्या मदतीने चंद्राच्या या भागातील पृष्टभागाची रचना आणि त्यात असलेल्या खनिजांची माहिती घेणार आहे. चीनने८ डिसेंबर रोजी शियांग सॅटेलाइल लाँच सेंटर येथून मार्च ३बी रॉकेटच्या मदतीने चांग ई ४ ये यान चंद्राच्या दिशेने सोडले होते.