एक वर्षापासून प्रयत्न करूनही ‘ती’ झाली नाही प्रेग्नंट; डॉक्टरांकडे गेल्यावर बसला धक्काच, जाणून घ्या कारण

बीजिंग : वृत्तसंस्था –  आई व्हावे असे अनेक महिलांना वाटत असते. लग्नानंतर मुलगी आई होण्याचे स्वप्न पाहते. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण काहींसाठी आई होणे ही काही सोपी गोष्ट नसते. मात्र, सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आई होणे सोपे बनले आहे. चीनच्या एका महिलेलाही लग्नानंतर आई बननण्याचा विचार होता. पण जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा धक्कादायक असा खुलासा झाला.

25 वर्षीय विवाहिता पिंगपिंग (बदललेले नाव) हिला लग्नानंतर आई होण्याची तीव्र इच्छा होती. मुलं होण्यासाठी खूप प्रयत्न केले पण गर्भधारणा झाली नाही. तिने काढलेला एक्स-रे जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन गेली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी पिंगपिंगला जन्मापासूनच पुरुष असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. पिंगपिंगचे किशोरावस्थेत हाडांचा विकास झाला नाही. तिच्यामध्ये पुरुष वाय गुणसूत्र आहेत. पिंगपिंगला दुर्मिळ आजार आहे. त्यामुळेच तिला कधीही पिरिअड्स आले नाहीत. गर्भवतीही राहू शकली नाही. पण तरीही डॉक्टरांनी ती आयुष्यभर महिला म्हणून जीवन जगू शकते असे सांगितले.

डॉक्टरांच्या सांगण्याने धक्का

जेव्हा पिंगपिंगला डॉक्टरांनी हे सांगितले तेव्हा तिला धक्काच बसला. ती सत्य स्वीकारण्यास तयारच होत नव्हती. पिंगपिंगला लैंगिक समस्या एक्स 46 ने पीडित आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे.

काय आहे यावर उपचार

पिरिअड न येण्याने तिने जर डॉक्टरांशी संपर्क केला असता तर तिला याची कल्पना आली असती. त्यामुळेच तिला लग्नानंतर गर्भधारणा होऊ शकली नाही. पिरिअड्स येत नसल्याचे समल्यानंतर हा चिंतेचा विषय होता. त्यामुळे पिंगपिंगने कोणालाही याची माहिती दिली नाही. यावर उपचार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.